Asia Cup 2023 Pakistan Captain Babar Azam 19th Century Against Nepal Know His Records Stats

[ad_1]

Babar Azam Century : मुल्तानमध्ये आशिया चषकाला दिमाखात सुरुवात झाली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नवख्या नेपाळपुढे पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. दोन्ही सलामी फलंदाज स्वस्तात परतले, पण बाबर आझम याने पाकिस्तानचा डाव सांभळला. आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात बाबर आझम याने वादळी सुरुवात केली. बाबर आझम याने शतकी खेळी करत पाकिस्तानची धावसंख्या वाढवली. 

पहिल्याच सामन्यात बाबर आझम याने शतक ठोकले. नेपाळविरुद्ध शतक ठोकत आपण फॉर्ममध्ये परतल्याचे बाबरने दाखवून दिले. बाबरने वनडे करिअरमधील 19 वे शतक ठोकले. बाबर आझम याच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाने आशिया चषक 2023च्या पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने अवघ्या 25 धावांवर दोन महत्वपूर्ण विकेट्स गमावल्या. मात्र, त्यानंतर बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि शतक ठोकले. बाबरने 109 चेंडूत वादळी शतक पूर्ण केले. बाबरच्या शतकी खेळीच्या बळावर पाकिस्तानने सन्मानजनक धावसंख्या उभारली.

बाबर आझम याने संयमी सुरुवात करत पाकिस्तानचा डाव सावरला. त्यानंतर विस्फोटक फलंदाजी करत धावसंख्या वाढवली. इफ्तिखारसोबत बाबर आझम याने दीडशे धावांची भागिदारी केली. त्याशिवाय मोहम्मद रिझवान याच्यासोबत 86 धावांची भागिदारी केली.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकली – 

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला. आशिया चषक सुरु होण्याच्या पूर्वसंध्येलाच पाकिस्तान संघाने प्लेईंग 11 ची घोषणा केली होती. पाहा दोन्ही संघात कोण कोणते खेळाडू ?

पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन –

फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हारिस रऊफ

नेपाळच्या संघात कोणते शिलेदार : 

कुशल भुर्टेल, आसिफ शेख (विकेटकीपर), रोहित पौडेल (कर्णधार), आरिफ शेख, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंह ऐरी, गुलसन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजबंशी

नेपाळचे आशिया चषकात पदार्पण – 

नेपाळच्या संघाने आशिया चषकात पदार्पण केले आहे. 20 वर्षीय रोहित पौडेल याच्याकडे नेपाळच्या संघाची धुरा आहे. नाणेफेकीवेळी रोहित म्हणाला की, संघातील सर्व सहकारी आनंदात आहेत. आशिया चषकात आमचा पहिलाच सामना आहे. नेपाळमधील प्रत्येक व्यक्ती उत्साहित आहे. 

नेपाळने आशिया चषकात आज पदार्पण केले. आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये नेपाळ संगाने दमदार कामगिरी केली आहे. पण पाकिस्तानविरोधात विजय मिळवणं नेपाळसाठी सोपं नसेल. पण नेपाळकडे गोलंदाजी दमदार आहे. संदीप लामिछाने हा अनुभव गोलंदाज आहे, तो एक्स फॅक्टर ठरु शकतो. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *