Baipan Bhaari Deva Movie 100 Police Officers Watched Film Kedar Shinde Share Post

[ad_1]

Baipan Bhaari Deva: बाईपण भारी देवा (Baipan Bhaari Deva) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं. नुकतेच या चित्रपटाच्या स्पेशल शोचे आयोजन करण्यात आले होते. सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेषतः ‘पुरुष’ कर्मचाऱ्यांसाठी बाईपण भारी देवा चित्रपटाचा स्पेशल शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी चित्रपटातील कलाकार वंदना गुप्ते आणि सुकन्या कुलकर्णी मोने, दिग्दर्शक केदार शिंदे (kedar shinde), सहनिर्माते अजित भुरे आणि जिओ स्टुडिओज मराठीचे कंटेंट हेड निखिल साने उपस्थित होते. या स्पेशल शोचा एक खास व्हिडीओ केदार शिंदे यांनी नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे.

केदार शिंदे यांची पोस्ट

केदार शिंदे यांनी नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचारी बाईपण भारी देवा चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत. या व्हिडीओला केदार शिंदे यांनी कॅप्शन दिलं, 100 डायल केलं तर मदतीसाठी पोलिस हजर होतात! काल 100 पोलिस “बाईपण भारी देवा” सिनेमा पहाण्यासाठी हजर होते. दिवसरात्र सणवार आपल्या सेवेत असलेले काल २।। तास आनंदात होते. सिनेमा संपल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान खुप काही देऊन गेलं. पुरूषांनी हा सिनेमा पाहायला हवा.. हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं. शुक्रवार पासून चित्रपट गृहात “बाईपण भारी देवा” फ्लॅट 100/- तिकीटावर पहायला मिळणार आहे. आता पुरूषांची गर्दी नक्कीच होईल. आपल्या आवडत्या स्त्री सोबत सिनेमा पहायला!!’

पाहा व्हिडीओ


 रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या मोने (Sukanya Mone), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar) आणि दीपा परब (Deepa Parab) या अभिनेत्रींनी बाईपण भारी देवा या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.  ‘बाईपण भारी देवा’  हा चित्रपट 30 जून रोजी रिलीज झाला. सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून प्रेक्षक आणि सेलिब्रिटी या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. 

संबंधित बातम्या

Baipan Bhaari Deva:  जेव्हा क्रिकेटचा “देव” “बाईपण भारी देवा” बघतो; सचिन तेंडुलकरनं चित्रपट पाहिल्यानंतर दीपा परबसोबत व्हिडीओ कॉलवर साधला संवाद, व्हिडीओ व्हायरल

 

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *