Beed News Another Nephew Will Enter Ajit Pawar Group

[ad_1]

Yogesh Kshirsagar in Ajit Pawar group : राष्ट्रवादीत काका पुतण्यात फुट पडल्यावर पक्षात दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे काही नेते काकाच्या तर काही नेते पुतण्याच्या गटात सहभागी झाले. दरम्यान, अशात आणखी एक चर्चा झाली ती म्हणजे बीड (Beed) जिल्ह्यातील जयदत्त क्षीरसागर (Jayadatt Kshirsagar) यांचे पुतणे संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) शरद पवारांच्या गटात सहभागी झाल्याची. पण आता त्याच जयदत्त क्षीरसागर यांचे दुसरे पुतणे योगेश क्षीरसागर (Yogesh Kshirsagar) हे अजित पवारांच्या (Ajit Pawar) गटात सहभागी होणार आहे. 27 ऑगस्ट रोजी बीडमध्ये होणाऱ्या सभेत अजित पवारांच्या उपस्थितीत योगेश यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे बीडच्या राजकारणात आता दोन पुतणे आणि काकाची चर्चा होणार आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी शरद पवार यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर आता त्यांचेच चुलत भाऊ योगेश क्षीरसागर हे दोन दिवसांमध्ये मुंबईत अजित पवार यांच्या गटात सामील होणार आहेत. तर, 27 तारखेला बीडमध्ये होणाऱ्या अजित पवार यांच्या सभेमध्ये कार्यकर्त्यांसह त्यांचा जाहीर प्रवेश होणार आहे. योगेश क्षीरसागर हे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे आहेत. विशेष म्हणजे, जयदत्त क्षीरसागर यांच्याशिवाय ते अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत.

डॉ. योगेश क्षीरसागर हे माजी नगरसेवक असून, नगराध्यक्ष डॉ. भारत भूषण यांचे ते चिरंजीव आहेत. गेल्या पाच-सात वर्षापासून योगेश क्षीरसागर हे जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत राजकारणामध्ये सक्रिय आहेत. तर, योगेश क्षीरसागर यांच्या पत्नी सारिका क्षीरसागर देखील राजकारणामध्ये आणि समाजकार्यात सक्रिय आहेत.

काकाला सोडून करणार पक्षप्रवेश…

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर योगेश क्षीरसागर यांनी आपले काका जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे अजित पवार यांच्या गटामध्ये जाण्यासाठी आग्रह धरला होता. मात्र, दत्त क्षीरसागर यांचा निर्णय होत नसल्याने अखेर योग्य योगेश क्षीरसागर यांनी आपला निर्णय स्वतः घेतला आहे. पुढच्या दोन दिवसांमध्ये ते मुंबईत अजित पवार यांच्या गटामध्ये सहभागी होत आहेत. तर, त्यांचा जाहीर प्रवेश बीडमध्ये होणाऱ्या सभेत होणार आहे. 

संदीप क्षीरसागर शरद पवारांसोबत…

जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे योगेश क्षीरसागर हे अजित पवारांच्या गटात सहभागी होणार आहे. मात्र, त्यांचे दुसरे पुतणे संदीप क्षीरसागर हे शरद पवारांसोबत असल्याचे पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते धनंजय मुंडे यांनी अजित पवारांच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. पण, याचवेळी आपण शरद पवारांच्या सोबत राहणार असल्याचं संदीप क्षीरसागर यांनी जाहीर केले. विशेष म्हणजे मागील आठवड्यात त्यांनी बीड जिल्ह्यात शरद पवारांची जाहीर सभा देखील घेतली. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Kshirsagar Family: बीडच्या राजकारणातील क्षीरसागर कुटुंब! एकाच घरात राहात असले तरी प्रत्येकाच्या खांद्यावर वेगवेगळा झेंडा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *