[ad_1]
Aurangabad News : अमृत भारत रेल्वे योजनेअंतर्गत औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू होण्याआधीच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) कार्यक्रमातून निघून गेले. यावर खुलासा करताना खासदार जलील म्हणाले की, दौलताबादला एक उद्घाटन आहे. त्यामुळे मी जात आहे. मी भाषणात मोदींचे अभिनंदन केले आहे. आठ वर्षांनी का होईना, औरंगाबादच्या रेल्वे स्थानकाला नवीन बिल्डिंग मिळत आहे. परंतु, यासोबतच रेल्वे कनेक्टिव्हिटी देखील पाहिजे. नुसती इमारत बांधून काही होणार नाही. मला कशाला विरोध होऊ शकतो, मी जय श्री रामच्या घोषणेला विरोध का करु. तर माझ्याकडे एकच ड्रेस राहिला असल्याने, आज मी काळा ड्रेस घालून आल्याचं जलील म्हणाले.
[ad_2]
source