Bhandara News Youth Dies Of Heart Attack Due To Overdose Of Viagra In Incident Happened While Spending Night With Girlfriend At Lodge

[ad_1]

भंडारा : शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनाने तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भंडाऱ्यात (Bhandara) घडली. लॉजवर मैत्रिणीसोबत रात्र घालवताना हा प्रकार घडला. तरुणीसोबत झालेल्या ओळखीनंतर दोघांमध्ये हळूहळू मोबाईलवर बोलणं सुरु झालं आणि त्यानंतर दोघांच्या बोलण्याचं प्रेमात रुपांतर झालं. यातूनच दोघेही भंडाऱ्यात भेटले आणि रात्र एकत्र घालवण्यासाठी एका लॉजवर थांबलेत. यावेळी तरुणाने “वायग्रा” (Viagra) गोळ्यांचं अतिसेवन केलं आणि त्यात तरुणाचा रक्तदाब (Blood Pressure) वाढल्याने हृदयविकाराने मृत्यू झाला.

आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या, भंडाऱ्यात भेटण्याचं ठरलं  

मृत तरुण 27 वर्षीय असून तो नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील आहे. तर, त्याची मैत्रीण 23 वर्षीय असून ती गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील आहे. काही महिन्यांपूर्वी दोघांची एका ठिकाणी भेट झाली. त्यानंतर ओळखीचं रुपांतर हळूहळू मैत्रीत झालं. दोघांचं मोबाईलवर बोलणं वाढलं आणि कालांतराने मैत्री प्रेमात बदलली. दोघांनीही प्रेमाचं रुपांतर विवाहात करुन एकमेकांची आयुष्यभर साथ द्यायची अशा आणाभाका घातल्या. त्यामुळे एकदा भेटायचं असं दोघांनीही ठरवून तरुण नागपूर इथून तर तरुणी गोंदियातून भंडाऱ्यात पोहोचले. 

वायग्राच्या दोन गोळ्यांचं सेवनाने रक्तदाब वाढला आणि …. 

दिवसभर भंडाऱ्यात सोबत फिरले. शॉपिंग केली आणि रात्र एकत्र घालवायची म्हणून दोघांनीही भंडारा मध्यवर्ती बसस्थानका लगत असलेल्या हिरणवार लॉजवर मुक्काम करण्याचा बेत आखला. यावेळी तरुणाने मेडिकलमधून “वायग्रा” 100 mg शक्तीवर्धक गोळ्या खरेदी केल्या. मैत्रिणीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी या तरुणाने चार पैकी दोन गोळ्यांचं म्हणजेच एकाचवेळी 200 mg गोळ्याचं सेवन केलं. गोळ्यांचं अतिसेवन केल्याने तरुणाचा अचानक रक्तदाब वाढला आणि त्यातच त्याला हृदयविकाराचा झटका झाल्याने तरुणाचं अंग थंडगार पडलं. त्यामुळे मैत्रिणीने लॉजच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने तरुणाला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणाची भंडारा पोलिसांनी नोंद केली असून अधिक तपास सुरु केला आहे.

शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार

मैत्रिणीसोबत रात्र घालवताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तरुणाचा मृत्यू हा वायग्रा शक्तिवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनाने झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तरुणाच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा

Bhandara: तीन वर्षीय चिमुकल्याला जमिनीवर आपटून ठार मारण्याचा प्रयत्न; मद्यपी बापाचा संतापजनक प्रकार

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *