CM Eknath Shinde Meet Salman Khan

[ad_1]

CM Eknath Shinde Meet Salman Khan :  बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडल्यानंतर एकच मोठी खळबळ उडाली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अभिनेता सलमान खानची त्याच्या राहत्या घरी भेट घेतली. यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनालही उपस्थित होते. 

रविवारी, 14 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास भाईजान सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थाना बाहेर गोळीबार झाला. बाईक वरून आलेल्या दोन अज्ञातांनी केलं आणि पळ काढला. लमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानसोबत फोनवरून चर्चा केली होती. 

मुंबई पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. या घटनेमागे कोण आहे, त्याची पाळेमुळे खणून काढण्याचे निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. जे या कटात सहभागी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असल्याचेही त्यांनी सांगितले. 

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *