Dharashiv News Eknath Lomte Maharaj Arrested For Abusing A Woman Osmanabad News

[ad_1]

धाराशिव : दैवी चमत्कारामुळे राज्यभर प्रसिद्ध असणारे कळंब तालुक्यातील मलकापूर (Kalamb Malkapur) येथील  एकनाथ सुभाष लोमटे महाराज  यांना पंढरपुरातून येरमाळा पोलिसांना अटक करण्यात आले आहे.  धाराशिव दर्शनासाठी आलेल्या महिलेस खोलीमध्ये बोलावून घेत विनयभंग करून मारहाण करत जीवे मारण्याची (Osmanabad News) धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी सापळा रुचून लोमटे महाराजाला पंढरपूरमधून अटक केली आहे.

दैवी चमत्कारामुळे राज्यभर प्रसिद्ध असणारे कळंब तालुक्यातील मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराजाविरोधात 28 जुलै 2022 रोजी पीडित भक्त महिलेनं तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लोमटे महाराजांविरोधात येरमाळा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित महिला मलकापूर येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर मलकापूर संस्थांनचे सर्वेसर्वा राष्ट्रसंत तसेच भाविकांच्या सर्व समस्येवर उपाय करणारे स्वयंघोषित राष्ट्रसंत लोमटे महाराज यांच्या दर्शनासाठी परळी येथील 35 वर्षीय महिला मठातील दक्षिण मंडपात गेली होती. 

लोमटे महाराजाला अटक

महाराजांनी महिलेस प्रवच खोलीमध्ये बोलून घेत महिलेचा विनयभंग केला होता.  या घटनेने मंदिर परिसरामध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता यावेळी महाराजांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्याच रात्री एक वाजता सुमारात महिलेच्या तक्रारीवरून महाराजांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात अटक ही झाली होती.  मात्र त्यांची जामीनवर सुटका झाली.  पीडित भाविक महिला अत्याचार प्रकरणी न्यायालयामध्ये दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशाने एकनाथ महाराज झाला पीडित मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांना अटक करण्यात आदेश दिले होते. त्यानुसार लोमटे महाराजाला अटक केली गेली आहे.

विविध पक्षांचे बडे नेते महाराजांचे भक्त

कळंब तालुक्यातील मलकापूर येथे लोमटे महाराज यांचा मठ आहे. आपल्या दैवी शक्तीने महाराज आजारी व्यक्ती आणि भक्ताला बरे करतात अशी महाराजांची ख्याती आहे.महाराजांचा राज्यभर मोठा भक्तवर्ग असून यामध्ये विविध पक्षांचे बडे नेते ही महाराज यांचे भक्त आहेत. भक्त महिलेच्या विनयभंग प्रकरणात लोमटे महाराज याला अटक झाल्याने धार्मिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. लोमटे महाराजांनी किती महिला भक्तांची फसवणूक केली हे तपासात उघड होईल, असं पोलिसांनी सांगितलं. लोमटे महाराजांवर या पूर्वीही जादूटोणा आणि लोकांना फसवल्याचे गुन्हे दाखल आहेत.

हे ही वाचा :

मोठी बातमी! इंदुरीकर महाराजांना सुप्रीम कोर्टाचा दणका; याचिका फेटाळली, काय आहे प्रकरण?

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *