Dream Girl 2 Ayushmann Khurrana Dance With Dream Girl Hema Malini Video Viral On Social Media

Dream Girl 2 Ayushmann Khurrana Dance With Dream Girl Hema Malini Video Viral On Social Media

[ad_1]

Dream Girl 2: अभिनेता आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana) चित्रपट ड्रीम गर्ल-2 (Dream Girl 2) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात आयुष्मान हा पूजा नावाच्या मुलीची भूमिका साकारणार आहे.  या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. प्रेक्षक ड्रीम गर्ल-2 या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. सध्या आयुष्मान हा त्याच्या सोशल मीडियावरील एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. आयुष्मानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तो ड्रीम गर्ल हेमा मालिनी (Hema Malini) यांच्यासोबत डान्स करताना दिसत आहे.  

आयुष्माननं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये  हेमा मालिनी आणि तो ड्रीम गर्ल या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओला आयुष्माननं कॅप्शन दिलं,  ‘या क्षणासाठी हेमा मालिनीजी तुमचे आभार, प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद’ आयुष्मान आणि हेमा मालिनी यांच्या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

पाहा व्हिडीओ:

ड्रीम गर्ल-2 ची स्टार कास्ट

ड्रीम गर्ल-2 हा चित्रपट  25 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. ज्यामध्ये आयुष्मानसोबत अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांकिल्य यांनी केले आहे.परेश रावल, अन्नू कपूर, विजय राज आणि राजपाल यादव हे कलाकार देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. ‘ड्रीम गर्ल-2’ हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ड्रीम गर्ल या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटामधील आयुष्मानच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता  ‘ड्रीम गर्ल-2’ या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  

हेमा मालिनी यांचे चित्रपट

मोहिनी, सपनों का सौदागर, शोले या चित्रपटातील हेमा मालिनी यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. शोले चित्रपटातील त्यांनी साकारलेल्या बसंती या भूमिकेमुळे हेमा मालिनी यांनी विशेष लोकप्रियता मिळाली. बॉलिवूडच्या ड्रीम गर्ल अशी हेमा मालिनी  यांची ओळख आहे. 1977 मध्ये रिलीज झालेल्या ड्रीम गर्ल (Dream Girl) या चित्रपटामध्ये हेमा मालिनी यांनी प्रमुख भूमिका साकारली.

 इतर महत्वाच्या बातम्या:

पूजाची भूमिका साकारून सगळा गोंधळ उडवणे हे आव्हानात्मक; ‘ड्रीम गर्ल 2’ चा ट्रेलर रीलिज झाल्यानंतर आयुष्मान खुराणाची प्रतिक्रिया

 

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *