Drinking-tea-on-an-empty-stomach-which-is-essentially-a-bed-tea-can-disrupt-metabolic-system Marathi News | Health Tips : जर तुम्हालाही बेड टी पिण्याचे व्यसन असेल तर आजपासूनच ही सवय सोडा; अन्यथा…

[ad_1]

Health Tips : अनेकांना सकाळी उठल्या उठल्या बेड टी लागतो. बेड टी शिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही. एवढेच नाही तर बेड टी पिण्यापूर्वी काही जण ब्रशही करत नाही. अशा लोकांचा असा विश्वास आहे की बेड टी प्यायल्यानंतर दिवसाची सुरुवात चांगली होते तसेच दिवसभर आपण उत्साही राहतो. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ब्रश न करता चहा पिणे दातांसाठी किती घातक आहे आणि त्याचा पोटावर काय परिणाम होतो.

रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते. असे केल्याने तुम्हाला आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. चला जाणून घेऊया ब्रश न करता चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी का हानिकारक आहे?

8-9 तासांच्या झोपेनंतर आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्या तोंडात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया जमा होतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही ब्रश न करता चहा प्यायलात तर त्यामुळे तुमची शुगर लेव्हल वाढते. त्यामुळे तोंडात अॅसिडची पातळी वाढते. यामुळे हिरड्या आणि दातांचं खूप नुकसान होतं. एवढेच नाही तर तोंडात पोकळी निर्माण होण्याचा धोकाही वाढतो आणि हिरड्यांशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. ब्रश न करता चहा प्यायल्यानेही दात खराब होतात. दात न घासता चहा प्यायल्यानेही डिहायड्रेशन होऊ शकते, ही एक मोठी समस्या आहे. यामुळेच प्रत्येकाने सकाळी उठल्याबरोबर दात घासल्याशिवाय चहा पिणे टाळावे.

सकाळी चहा पिण्याची योग्य पद्धत कोणती?

जर तुम्हाला सकाळी उठल्यावर लगेच चहा पिण्याची सवय असेल तर या सवयीत थोडा बदल करा. चहा पिण्याऐवजी, अंथरुणातून उठल्याबरोबर भरपूर पाणी प्या. रिकाम्या पोटी पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चहा पिण्यापूर्वी पाणी प्यायल्याने चहाचा शरीरावरील प्रभाव कमी होतो.  

15 ते 20 मिनिटे पाणी प्यायल्यानंतर चहा प्यायल्याने होणारा अॅसिडिक प्रभाव तुमच्या शरीराला हानी पोहोचवत नाही. हे देखील लक्षात ठेवा की, चहा पिताना किंवा चहा प्यायल्यानंतर लगेचच, पाण्याचे सेवन अजिबात करू नका. चहा प्यायल्यानंतर 20-25 मिनिटांनीच पाणी प्या. किंवा चहा पिण्याआधी 15-20 मिनिटे पाणी प्या.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : BP च्या चुकीच्या रिडींगने सुद्धा वाढू शकते तुमची चिंता; जाणून घ्या रक्तदाब तपासण्यासाची योग्य वेळ आणि पद्धत

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *