[ad_1]
पॅरिस, फ्रान्स : फ्रान्सची (France) राजधानी पॅरिसमधीलप्रसिद्ध आयफेल टॉवर (Eiffel Tower) बॉम्बने उडवण्याची धमकी (Bomb Threat) मिळाल्याने एकच खळबळ माजली आहे. आयफेल टॉवर बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने इमारतीतून लोकांना बाहेर काढण्यात आलं असून तेथे बॉम्ब शोधक पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने आयफेल टॉवर शनिवारी बंद ठेवण्यात आलं होतं. तसेच नागरिक आणि पर्यटकांना या परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली. फ्रान्सच्या पोलिसांच्या सुत्रांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, आयफेल टॉवर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याने येथून लोकांना बाहेर काढण्यात आलं.
प्रसिद्ध आयफेल टॉवर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली, यामुळे शनिवारी आयफेल टॉवरमधील तीन मजल्यांवरील नागरिकांना बाहेर काढण्यात आलं. पॅरिसमधील आयफेल टॉवर जगभरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. यामुळे येथे जगभरातील पर्यटक भेट देत असतात. दररोज हजारो देशी-विदेशी पर्यटक आयफेल टॉवर पाहण्यासाठी येत असतात.
.
[ad_2]
Source link