Entertainment news today latest Bollywood news today celebrity news movie trailer movie review Bollywood Marathi news 15 August 2023

Entertainment news today latest Bollywood news today celebrity news movie trailer movie review Bollywood Marathi news 15 August 2023

[ad_1]

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Viral Video: क्रेझ असावी तर अशी! ‘गदर 2’ पाहण्यासाठी ट्रॅक्टरवर पोहोचले फॅन्स

Sunny Deol Blockbuster Hit Gadar 2 : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) बहुचर्चित ‘गदर 2’ (Gadar 2) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काही वर्षांपासून प्रेक्षक प्रतीक्षा करत असलेला हा सिनेमा अखेर प्रदर्शित झाल्यामुळे हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळत आहेत. गदर चित्रपटाला लोकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये सनी देओलचे चाहते मोठमोठे ट्रॅक्टर आणि ट्रक घेऊन चित्रपटगृहांकडे जाताना दिसत आहेत. परिस्थिती अशी आहे की चाहते मॉलच्या पार्किंगमध्ये त्यांच्या कारऐवजी ट्रॅक्टर आणि ट्रक पार्क करताना दिसले. प्रत्येक ट्रक आणि ट्रॅक्टरमध्ये तब्बल 20-20 लोक भरून आले होते. त्याचा हा व्हिडीओ राजस्थानातून समोर आला आहे. 

Seema Haider: सीमा हैदरने दिल्या ‘हिंदुस्तान जिंदाबाद’,‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा; चित्रपटाची ऑफर नाकारली

Seema Haider: पाकिस्तानची  सीमा हैदर (Seema Haider) आणि भारतामधील सचिन  (Sachin Meena) या  जोडप्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे. सीमा आणि सचिनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या सीमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती ‘हिंदुस्तान जिंदाबाद’,‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा देताना दिसत आहे. 

Baipan Bhaari Deva : ‘सैराट’चा रेकॉर्ड मोडणार ‘बाईपण भारी देवा’? कमाईचा आकडा पाहून व्हाल थक्क

Baipan Bhaari Deva Box Office Collection : ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा 30 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून आजही या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. एकीकडे प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहावा यासाठी निर्माते वेगवेगळे फंडे आजमावत आहेत. तर दुसरीकडे हा सिनेमा दिवसेंदिवस वेगवेगळे रेकॉर्ड्स आपल्या नावे करत आहे. लवकरच हा सिनेमा नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’चा (Sairat) रेकॉर्ड मोडू शकतो. 

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *