Entertainment news today latest Bollywood news today celebrity news movie trailer movie review Bollywood Marathi news 16 August 2023

Entertainment news today latest Bollywood news today celebrity news movie trailer movie review Bollywood Marathi news 16 August 2023

[ad_1]

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Heart of Stone Review : आलिया भट्टचा पहिला हॉलिवूड सिनेमा ‘हार्ट ऑफ स्टोन’कसा आहे? वाचा रिव्ह्यू…

Heart Of Stone Movie Review : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) अभिनीत ‘हार्ट ऑफ स्टोन’ (Heart Of Stone) हा हॉलिवूडपट आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा अभिनेत्रीचा पहिलाच हॉलिवूडपट असल्याने या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. पण पहिलाच हॉलिवूड सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला आहे.

The Great Indian Family Release Date: द ग्रेट इंडियन फॅमिली ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस; विकी कौशल आणि मानुषी छिल्लर प्रमुख भूमिकेत

The Great Indian Family Release Date: अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ (The Great Indian Family) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटात विकी कौशलोबतच मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य यांनी केले आहे. ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ या चित्रपटाच्या टीमनं नुकताच एक  मजेदार व्हिडिओ शेअर करुन या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.’द ग्रेट इंडियन फॅमिली’ हा चित्रपट 22 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. नुकताच विकी कौशलनं या चित्रपटाचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तो त्याच्या अतरंगी फॅमिलीबाबत बोलताना दिसत आहे. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिल, “एक से बढ़कर एक, इस परिवार के रंग है अनेक। इसीलिये तो हम हैं – द ग्रेट इंडियन फ़ैमिली. 22 सितंबर को मिलते हैं!”

Sharad Ponkshe : स्वातंत्र्यदिनी शरद पोंक्षेंची मोठी घोषणा; प्रेक्षकांच्या आग्रहाखातर ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाचे पुन्हा प्रयोग करणार

Sharad Ponkshe On Me Nathuram Godse Boltoy Drama : अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) सध्या चर्चेत आहेत. शरद पोंक्षे यांचं ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ (Me Nathuram Godse Boltoy) हे नाटक चांगलच गाजलं. एकीकडे हे नाटक गाजत असताना दुसरीकडे या नाटकाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. पण आता पुन्हा या नाटकाचे प्रयोग करण्याचा निर्णय शरद पोंक्षेंनी घेतला आहे.

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *