[ad_1]
Eye Conjunctivitis : राज्यात डोळ्यांच्या साथीचा उद्रेक; सर्वाधिक रूग्ण बुलढाण्यात देशासह राज्यात सध्या डोळ्यांची साथ आलीय.
राज्याच्या अनेक भागांमध्ये डोळे येण्याच्या साथीचा उद्रेक झालाय. आत्तापर्यंत एक लाख ८७ हजार रुग्ण आढळल्याची माहिती आोग्य विभागाच्या सुत्रांनी दिलीये. सर्वाधिक रुग्णंसख्या बुलढाण्यात असून, त्यापाठोपाठ जळगाव, अमरावती आणि पुण्यात आढळून आलेत. रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आरोग्य विभाग अधिक रुग्णंसख्येच्या भागात सर्वेक्षण करून उपाययोजना करीत आहे. गेल्या महिन्यात पुणे जिल्ह्यात आळंदी परिसरात डोळय़ाच्या साथीचे चार हजारांहून अधिक रुग्ण आढळले होते. त्यामुळे प्रत्येकानं काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंये.
[ad_2]
source