Fans started gathering at the Outside of Wankhede stadium and chanting Mumbai Ka Raja Rohit Sharma

[ad_1]

Chants For Rohit Sharma : हार्दिक पांड्याच्या (hardik pandya) नेतृत्वातील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यंदाच्या हंगामातील तिसरा सामना आज खेळणार आहे. मुंबई आणि राजस्थान (MI vs RR) यांच्यामध्ये वानखेडेच्या मैदानावर आज आमनासामना होणार आहे. मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच घरच्या मैदानावर खेळत आहे. मुंबईला पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे पहिल्या विजयासाठी मुंबईचा संघ आज मैदानात उतरणार आहे. या सामन्यापूर्वी वानखेडे मैदानाबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी जमली आहे. रोहित शर्माच्या चाहत्यांनी घोषणांनी परिसर हादरुन सोडला आहे. वानखेडे स्टेडियमबाहेर रोहित शर्माच्या चाहत्यांनी माहोल केला आहे. चाहत्यांकडून “मुंबईचा राज रोहित शर्मा ” अशी घोषणाबाजी सुरु आहे. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हार्दिक पांड्याला मुंबईची धुरा दिल्यानंतर रोहित शर्माचे चाहते नाराज झाले, मुंबईच्या पहिल्या दोन्ही सामन्यात चाहत्यांनी हार्दिक पांड्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले. आजच्या सामन्यावेळीही हार्दिक पांड्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागू शकतो. 

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला यंदाच्या हंगामातील पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. आज राजस्थानविरोधात मुंबई इंडियन्स पहिल्या विजयासाठी मैदानात उतरले. वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमवली आहे. चाहत्यांकडून रोहित शर्मासाठी घोषणाबाजी केली जात आहे. प्रत्येकाच्या हातात रोहित शर्मासाठी खास बोर्डही दिसत आहे. मुंबईचा राजा रोहित शर्मा आशाप्रकारची नारेबाजी चाहत्यांकडून केली जात आहे. रोहित शर्माच्या नावाची जर्सीही अनेकांनी घातली आहे. वानखेडेबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. काहींनी पांड्याविरोधात घोषणाबाजीही केली. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 

 
पहिल्या दोन्ही सामन्यात हार्दिक पांड्याल ट्रोल

आयपीएल 2024 आधी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला. रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेतलं, हार्दिक पांड्याकडे मुंबईच्या संघाची धुरा सापवण्यात आली. त्यामुळे रोहित शर्माचे चाहते मोठ्या प्रमाणात नाराज झाले. त्यांनी आपला संताप सोशल मीडियावर व्यक्त केला. त्याशिवाय मुंबईच्या पहिल्या दोन्ही सामन्यातही रोहित शर्माच्या चाहत्यांनी आपला संताप व्यक्त केला. हार्दिक पांड्याविरोधात चाहत्यांनी घोषणाबाजी केली. हार्दिक पांड्याला कर्णधार केल्याचं रोहित शर्माच्या चाहत्यांना रुचले नाही. त्यामुळे हार्दिक पांड्याला पहिल्या दोन्ही सामन्यात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अहमदाबाद आणि हैदराबाद येथे झालेल्या दोन्ही सामन्यात हार्दिक पांड्याविरोधात घोषणाबाजी झाली. त्याशिवाय रोहित शर्माचा आदर करणारे पोस्टरही झळकले. दरम्यान, मुंबई इंडियन्समध्ये दोन गट पडल्याच्या चर्चाही सुरु आहेत. एकूणच काय तर नेतृत्व बदल केल्यामुळे मुंबईच्या ताफ्यात सर्वकाही ठीक नाही. याचा फटका संघाच्या कामगिरीवर बसण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्या यातून कसा मार्ग काढतो, हे येणाऱ्या दिवसात स्पष्ट होईल. 

अधिक पाहा..



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *