Former Sri Lankan cricketer Lahiru Thirimanne has been hospitalized following a road accident in Thrippane Anuradhapura

[ad_1]

Lahiru Thirimanne Accident : श्रीलंकेला चॅम्पियन करणारा लाहिरू थिरिमने याच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर अनेकांना ऋषभ पंतच्या अपघाताची आठवण झाली. लाहिरू थिरिमने याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लाहिरू थिरिमने याच्या गाडीचा अपघात इतका भीषण होता, की गाडीचा चक्काचूर झाला. लाहिरू थिरिमने  याच्याबद्दल सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. 

श्रीलंकेचा माजी कर्णधार लाहिरू थिरिमने याच्या गाडीचा सकाळी भीषण अपघात झाला. अनुराधापूर शहराजवळ सकाळी पावनेआठ वाजता लाहिरू थिरिमने याचा अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये लाहिरू थिरिमने  थोडक्यात वाचला. लक्झरी गाडीचा चक्काचूर झालाय. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लाहिरू थिरिमने  याच्या प्रकृतीविषयी अद्याप कोणताही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्याच्यावर अनुराधापूर टिचिंग रुग्णालयात उपचार सुरु आहे. लाहिरू थिरिमने  याच्याशिवाय गाडीमध्ये असणाऱ्या तीन व्यक्तींवरही उपचार सुरु आहेत. देव बलवत्तर म्हणून लाहिरू थिरिमने  थोडक्यात बचावलाय. लाहिरू थिरिमने  याच्या कार अपघातानंतर अनेकांना ऋषभ पंत याच्या अपघाताची आठवण झाली. 2022 डिसेंबर मध्ये ऋषभ पंत याच्या गाडीलाही भीषण अपघात झाला होता. त्यामधून पंत थोडक्यात बचावला होता.

देवदर्शनाला जात होता लाहिरू थिरिमने – 

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, लाहिरू थिरिमने  कुटुंबासोबत देवदर्शनाला निघाला होता. त्यावेळी त्याच्यावर काळाने घाला घातला. देव बलवत्तर म्हणून भीषण अपघातांमधून तो थोडक्यात बचावला आहे. लाहिरू थिरिमने याने 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. लाहिरू थिरिमने  याने श्रीलंकाकडून 44 कसोटी,  127 वनडे आणि 26 टी 20 सामने खेळले आहेत. लाहिरू थिरिमने  याने कसोटीमध्ये 2088, वनडेमध्ये 3194 आणि टी20 मध्ये 291 धावा ेकल्या आहेत. लाहिरू थिरिमने 2014 च्या टी 20 विश्वचषक विजेत्या श्रीलंका संघाचा सदस्य होता. 

भारताविरोधात अखेरचा सामना – 

लाहिरू थिरिमने  यानं सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती घेतली आहे. लाहिरू थिरिमने  याने श्रीलंकेसाठी पाच वनडे सामन्यात नेतृत्व केलेय. त्यानं मार्च 2022 मध्ये श्रीलंकासाठी अखेरचा वनडे सामना खेळला होता.  जुलै 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. लाहिरू थिरिमने यानं अखेरचा कसोटी सामना भारताविरोधात खेळला होता. बंगळुरु येथे झालेल्या  सामन्यात त्यानं पहिल्या डावात 8 आणि दुसऱ्या डावात शून्य धावा केल्या होत्या.  

अधिक पाहा..



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *