Gadar 2 Trailer Release Sunny Deol Ameesha Patel Film Fans Praised Actor Look

[ad_1]

Sunny Deol Gadar 2 Trailer Out: अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अभिनेत्री अमिषा पटेल (Ameesha Patel)  यांच्या  ‘गदर 2’ (Gadar 2) या चित्रपटाचा ट्रेलर काल (26 जुलै) रोजी रिलीज झाला. या ट्रेलरमधील तारा सिंहच्या डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  ‘गदर 2’  चित्रपटाच्या ट्रेलरमधील तारा सिंहच्या जबरदस्त अ‍ॅक्शनने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. अनेक नेटकऱ्यांनी  ‘गदर 2’ या चित्रपटाच्या ट्रेलरचं सोशल मीडियावर कौतुक केलं आहे.

‘गदर 2’चा ट्रेलर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांची रिअॅक्शन

अनेक नेटकऱ्यांनी ‘गदर 2’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या ट्रेलरचं कौतुक केलं आहे. गदर-2 चित्रपटाच्या ट्रेलरला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘क्या बात है सनी सर,अंगावर शहारे आले’ तर एका युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं, ‘यावेळी बाप आणि मुलाची जोडी धम्माल करणार आहे. खूप छान ट्रेलर आहे.’

 ‘गदर 2′ या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अनिल शर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.’गदर 2’ हा चित्रपट ‘गदर एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे.गदर एक प्रेम कथा हा चित्रपट 2001 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट आजही लोक आवडीने बघतात. 

 ‘गदर 2’ ची स्टार कास्ट

‘गदर 2’  या चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्यासोबतच उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर हे कलाकार देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत.   

काही दिवसांपूर्वी या चित्रपटामधील ‘ओ घर आजा परदेसी’  हे गाणं रिलीज झालं होतं. या गाण्यात सकिना आणि तारा सिंह यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला. आता गदर-2 हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकेल की नाही? हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल की नाही? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Gadar 2 New Song: मुलाच्या आठवणीत तारा सिंह भावूक, सकिनाला झाले अश्रू अनावर; गदर 2 मधील ‘खैरियत’ गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *