[ad_1]
Haryanvi Singer Raju Punjabi Death: गायक राजू पंजाबी (Raju Punjabi) यांनी वयाच्या 40 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे हरियाणातील रुग्णालयात निधन झाले. रिपोर्टनुसार, राजू पंजाबी यांना काही काळ हरियाणातील हिसार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता राजू पंजाबी यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
एका रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राजू पंजाबी घरी परतले होते, मात्र त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागले. गायक केडी देसी रॉकने हॉस्पिटलमधील राजू यांचा फोटो शेअर केला आणि लिहिले, “राजू परत ये”
मनोहर लाल खट्टर यांनी व्यक्त केला शोक
राजू पंजाबी (Raju Punjabi) यांच्या निधनानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनीही ट्वीट शेअर करून शोक व्यक्त केला आहे. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की,’प्रसिद्ध हरियाणवी गायक आणि संगीत निर्माता राजू पंजाबी यांच्या निधनाची दुःखद बातमी मिळाली. त्यांच्या जाण्याने हरियाणा संगीत उद्योगाचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास त्यांच्या पावन चरणी स्थान देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे अपार दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.’
प्रसिद्ध हरियाणवी गायक एवं संगीत निर्माता राजू पंजाबी जी के निधन का दुखद समाचार प्राप्त हुआ। उनका जाना हरियाणा म्यूजिक इंडस्ट्री के लिए अपूरणीय क्षति है।
ईश्वर दिवंगत आत्मा को अपने श्री चरणों में स्थान दें तथा उनके परिजनों को यह अथाह दुःख सहन करने की शक्ति प्रदान करें।
ॐ शांति!
— Manohar Lal (@mlkhattar) August 22, 2023
राजू पंजाबी यांची गाणी
काही दिवसांपूर्वी राजू यांनी त्याचे शेवटचे गाणे ‘आपसे मिलके यारा हमको अच्छा लगा’ (Aapse Milke Yara Humko Achha Laga) रिलीज केले. त्यांनी इन्स्टाग्रामवर या गाण्याबद्दल पोस्ट शेअर केली होती. राजू पंजाबी यांच्या अछा लागे से, देसी देसी, तू चीज लाजवाब, लास्ट पेग आणि भांग मेरे यारा या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यांनी सपना चौधरीसोबत एका प्रोजेक्टवर काम केले.
संबंधित बातम्या
.
[ad_2]
Source link