Hema Malini Praised Sunny Deol Gadar 2 Hema Malini On Sunny Deol Ameesha Patel Utkarsh Sharma Movie Gadar 2 Bollywood Movie Entertainment After Esha Deol, Hema Malini Watches Gadar 2 Calls Sunny Deol Superb

Hema Malini Praised Sunny Deol Gadar 2 Hema Malini On Sunny Deol Ameesha Patel Utkarsh Sharma Movie Gadar 2 Bollywood Movie Entertainment After Esha Deol, Hema Malini Watches Gadar 2 Calls Sunny Deol Superb

[ad_1]

Hema Malini Praised Sunny Deol : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) ‘गदर 2’ (Gadar 2) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ‘गदर’ आणि सनी देओलचे चाहते या सिनेमाचं कौतुक करत आहेत. बॉलिवूडची ड्रीम गर्ल अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनीदेखील त्यांच्या सावत्र लेकाचा सिनेमा पाहिला आहे. त्यांच्या प्रतिक्रियेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

‘गदर 2’च्या विशेष स्क्रिनिंगला सनी देओलचा सावत्र बहीण ईशा देओलनेही हजेरी लावली होती. पण हेमा मालिनी मात्र या स्किनिंगला उपस्थित नव्हत्या. त्यामुळे चाहत्यांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. पण आता अखेर हेमा मालिनी यांनी वेळ काढून ‘गदर 2’ हा सिनेमा पाहिला आहे. सिनेमा पाहिल्यानंतर अभिनेत्रीने सनी देओल आणि ‘गदर 2’चं भरभरून कौतुक केलं आहे.

‘गदर 2’ पाहिल्यानंतर हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया काय? (Hema Malini Reaction ON Gadar 2)

‘गदर 2′ पाहिल्यानंतर हेमा मालिनी म्हणाल्या,”गदर 2’ हा सिनेमा मी पाहिला आहे. अपेक्षेप्रमाणे सिनेमा खूपच चांगला आहे. हा सिनेमा पाहताना 70-80 च्या काळात गेल्यासारखं वाटलं. अनिल शर्माचं उत्कृष्ट दिग्दर्शन आणि सनी देओलचा दर्जेदार अभिनय. उत्कर्ष शर्मानेही चांगलं काम केलं आहे. हा सिनेमा पाहून राष्ट्रपती देशप्रेमाची भावना भरुन येते आणि हिंदू आणि मुस्लिमांप्रती बंधुभाव असायला हवा हा विषय या सिनेमात दाखवण्यात आला आहे. या सिनेमाने भारत आणि पाकिस्तानवर चांगला संदेश दिला आहे”.

हेमा मालिनींना आवडली तारा-सकीनाची जोडी

हेमा मालिनी यांनी तारा सिंह आणि सकिना यांच्या जोडीचं कौतुक केलं आहे. त्या म्हणाल्या,”22 वर्षांनंतर सनी देओल आणि अमिषा पटेलची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. दोघांच्या जोडीची क्रेझ आजही कायम असून दोघांनीही छान काम केलं आहे. ‘गदर 2’ (Gadar 2) या सिनेमातील गाणी त्या काळात खूप हिट झाली होती आणि आता त्याची पुनरावृत्ती झाली आहे. सिनेमात बाप-मुलाची जोडी चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे”.

‘गदर 2’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ (Gadar 2 Box Office Collection) 

‘गदर 2’ हा सिनेमा प्रदर्शित होऊन नऊ दिवस पूर्ण झाले आहेत. ओपनिंग डे आणि वीकेंडला चांगलीच कमाई करणाऱ्या या सिनेमाने रिलीजच्या नऊ दिवसांत भारतात 336.13 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात 395.1 कोटींचा गल्ला जमवला आहे. कोरोनानंतर सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा सिनेमा ठरला आहे. ‘गदर 2’ या सिनेमात सनी देओल (Sunny Deol), अमिषा पटेल(Ameesha Patel) आणि उत्कर्ष शर्मा (Utkarsh Sharma) मुख्य भूमिकेत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर सिनेमा प्रदर्शित झाल्याचा निर्मात्यांना फायदा झाला आहे.

संबंधित बातम्या

Box Office Collection : सनीचा ‘गदर 2’, रजनीकांतचा ‘जेलर’ अन् अक्षयचा ‘OMG 2’ बॉक्स ऑफिसवर सुसाट; अभिषेकच्या ‘घूमर’चे आकडे मात्र निराशाजनक

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *