[ad_1]
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तोषखाना केसमध्ये तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे… कोर्टाने त्यांना एक लाख रुपयांचा दंड केला आहे.. महत्त्वाचं म्हणजे पुढील पाच वर्षं इम्रान निवडणूक लढवू शकणार नाहीत. त्यामुळे येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत इम्रान खान लढू शकणार नाहीत. काही दिवसात पाकिस्तानमध्ये निवडणुका होणार आहेत. निवडणुकीत आपला पक्ष जिंकेल असा विश्वास इम्रान खान यांनी अनेकदा व्यक्त केला होता.इम्रान खान पंतप्रधानपदी असताना त्यांनी त्यांच्या निवासस्थानातील अनेक वस्तू विकल्या, आणि त्यातून आलेले पैसे स्वतःच्या खात्यात वळवले, असे आरोप त्यांच्यावर १० मे रोजी सिद्ध झालेत.
[ad_2]
source