Ind Vs Wi Virat Kohli One Handed Catch Romario Shepherd Bowled By Ravindra Jadeja West Indies Vs India 1st Odi

[ad_1]

Virat Kohli Catch India vs West Indies : भारत आणि विडिंज यांच्यामध्ये बारबाडोस येथे पहिला एकदिवसीय सामना सुरु आहे. प्रथम फलंदाजी करताना यजमान विडिंजचा संघाचा 114 धावांत खुर्दा उडाला. भारतीय फिरकी गोलंदाजीसमोर विडिंजचे फलंदाज ढेपाळले. या सामन्यात विराट कोहलीने जबराट झेल घेतला. या झेलचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर रोमारियो शेफर्ड याचा झेल विराट कोहलीने अचूक टिपला. विराट कोहलीने घेतलेल्या या झेलचे कौतुक होत आहे. सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. 

वेस्ट इंडिजची फलंदाजी ढेपाळली. आघाडीचे फलंदाज भारतीय गोलंदाजीपुढे प्रभावहीन ठरले. रोमारियो शेफर्ड वेस्ट इंडिजसाठी 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. रविंद्र जडेजा 18 वे षटक टाकत होता. जडेजाच्या षटकातील चौथ्या चेंडूवर शेफर्ड कोहलीकडे झेल देऊन बाद झाला. हा झेल खूप कठीण होता, पण कोहलीने तो एका हाताने पकडला. शेफर्ड याला खातेही उघडला. कोहलीच्या या झेलचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. त्याच्या चाहत्यांनी या झेलचे अनेक फोटो आणि व्हिडीओ ट्विटरवर शेअर केले आहेत. 

रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादव यांच्या फिरकीपुढे वेस्ट इंडिजचा संघ 23 षटकात 114 धावांवर ऑलआऊट झाला. कर्णधार शाय होप याने एकाकी झुंज दिली. होप याने 45 चेंडूत 43 धावा केल्या. त्याने 4 चौकार आणि 1 षटकार मारला. सलामीवीर ब्रँडन किंग 17 धावा करून बाद झाला. अलिक 22 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यादरम्यान भारताकडून कुलदीप यादवने 4 बळी घेतले. त्याने 3 षटकांत 6 धावा दिल्या आणि 2 षटके निर्धाव टाकली. रविंद्र जडेजाने 6 षटकांत 37 धावा देत 3 बळी घेतले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *