Independence Day 2023 Kangana Ranaut To Mahesh Babu Celeb Celebrating 15 August By Wishing Fans

[ad_1]

Independence Day Wishes: आज देशभरात स्वातंत्र्यदिन (Independence Day 2023) उत्साहात साजरा होत आहे. देशातील प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्यदिन साजरा करत असतो. त्याचबरोबर बॉलिवूड आणि साऊथ सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत . सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कंगना रनौतनं (Kangana Ranaut) शेअर केली पोस्ट

कंगना रनौतने इन्स्टा स्टोरीमध्ये खास फोटो शेअर करुन सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. फोटो शेअर करुन कंगनानं कॅप्शनमध्ये लिहिले, ‘स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा’.

अनुपम खेर यांनी दिल्या शुभेच्छा

अभिनेते अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ शेअर करुन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, “मला अनेकदा विचार करतो की आपल्या तिरंग्याला देशवासियांसमोर आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली तर तिरंगा आपल्याला काय म्हणेल? स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर, या व्हिडिओमध्ये मी आपल्या राष्ट्रध्वजाच्या वतीने देशवासियांना संबोधित करण्याचा प्रयत्न केला आहे! हा व्हिडीओ शेअर करा! सर्व भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद! भारत माता चिरंजीव हो!’


काजोलने  इन्स्टाग्राम प्रोफाईल पिक्चरवर तिरंग्याचा फोटो ठेवला आहे आणि चाहत्यांना तिनं स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  

साऊथचा सुपरस्टार महेश बाबूने (Mahesh Babu) ट्विटर अकाऊंटवर ट्वीट शेअर करुन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक जण देशभक्तीपर चित्रपट पाहतात. तसेच देशभक्तीपर गाणी देखील अनेक जण स्वातंत्र्य दिनानिमित्त ऐकतात. देशभक्तीवर आधारित गाणी ऐकून मनात अभिमानाची भावना जागृत होते.  मेरे देश की धरती सोना उगले,दुल्हन चली,ऐ मेरे प्यारे वतन,आय लव्ह माय इंडिया,मेरा रंगदे बसंती,ऐसा देस है मेरा ,ऐ वतन मेरे आबाद रहे तू ही हिंदी गाणी देखील तुम्ही स्वातंत्र्य दिनाला ऐकू शकता.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Independence Day 2023: उठा राष्ट्रवीर हो ते हे राष्ट्र देवतांचे; यंदा स्वातंत्र्य दिनाला ऐका ‘ही’ मराठी देशभक्तीपर गाणी

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *