[ad_1]

जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ब्रिक्स देशांच्या बैठकीसाठी दक्षिण आफ्रिकेत आहेत. या बैठकीत चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे देखील दाखल झाले आहेत. आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग हे दोन्ही नेते चर्चा करत असल्याचे दिसून आले. दोन्ही नेत्यांमध्ये औपचारिक बैठक झाली नाही. मात्र, दोन्ही नेत्यांनी चालता चालता एकमेकांशी संवाद साधला.

भारताचे पंतप्रधान आणि चीनच्या राष्ट्रपतींमध्ये संवाद झाल्याने चर्चांना उधाण आले. त्यावर परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी या भेटीबाबत भाष्य केले. दोन्ही नेत्यांनी आपल्या संबंधित अधिकाऱ्यांना दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठीच्या सूचना देण्याचे मान्य केले.

चिनी राष्ट्रपतींना दिली माहिती

पंतप्रधानांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना प्रत्यक्ष ताबा रेषेवर न सुटलेल्या मुद्यांबाबत कल्पना देण्यात आली.भारत-चीन संबंध सामान्य करण्यासाठी सीमावर्ती भागात शांतता राखणे आणि LAC चा आदर करणे आवश्यक असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

ब्रिक्स बिझनेस फोरम महत्त्वाचा

विनय क्वात्रा पुढे म्हणाले की, ब्रिक्स बिझनेस फोरम हे ब्रिक्स-आंतर-ब्रिक्स भागीदारीच्या प्रमुख स्तंभांपैकी एक असल्याचे पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केले. त्यांनी एका महत्त्वाच्या घटकाबद्दल, लवचिक आणि सर्वसमावेशक पुरवठा साखळी विकसित करण्याची गरज आणि ब्रिक्स देशांतर्गत परस्पर विश्वास आणि पारदर्शकतेच्या महत्त्वावर भाष्य केले.

इंडोनेशियामध्येही झाली होती भेट

नोव्हेंबर 2022 च्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियातील बाली येथे इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी आयोजित केलेल्या G-20 डिनरमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. ही देखील अनौपचारिक भेट होती. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना हात जोडून अभिवादन केले. एप्रिल 2020 मध्ये पूर्व लडाखमध्ये चिनी लष्कर आणि भारतीय लष्कर यांच्यात झालेल्या संघर्षानंतर दोघांमधील ही पहिली भेट होती.

ब्रिक्सच्या विस्ताराला भारताचा पाठिंबा

ब्रिक्स देशांच्या सदस्य संख्येत वाढ करण्याच्या प्रस्तावाला भारताने पाठिंबा दिला. पंतप्रधान मोदी यांनी ब्रिक्सच्या विस्ताराबाबत कोणतीही अडचण नसल्याचे म्हटले. बुधवारी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत ब्रिक्सच्या विस्ताराला पूर्ण पाठिंबा देतो आणि या दिशेने सर्वसहमतीने प्रगतीचे स्वागत करतो. अंतराळ संशोधनासह अनेक क्षेत्रात गटातील सदस्य देशांमधील सहकार्याची व्याप्ती आणखी वाढवण्यासाठी त्यांनी पाच सूचना दिल्या.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

15th BRICS summit : ‘ब्रिक्स’चा नेमका अर्थ काय? कोणते देश आहेत यामध्ये सहभागी, वाचा सविस्तर

[ad_2]
Source link
India China : ब्रिक्स परिषद: PM मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात काय चर्चा झाली? परराष्ट्र सचिवांनी सांगितले…