India VS Bharat दरम्यान अक्षयने बदलली ‘Mission Raniganj’ची टॅगलाईन

India VS Bharat दरम्यान अक्षयने बदलली 'Mission Raniganj'ची टॅगलाईन

[ad_1]

Akshay Kumar Changed His Film Title Amid India-Bharat Row : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारने (Akshay Kumar) त्याच्या आगामी सिनेमाचा टीझर शेअर करत चाहत्यांना खास भेट दिली आहे. या टीझरमधील एका गोष्टीने मात्र चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. India VS Bharat दरम्यान खिलाडीने त्याच्या सिनेमाची टॅगलाईन बदलली आहे.

खिलाडीने इंडिया ऐवजी केलं भारत

अक्षय कुमारने त्याच्या आगामी सिनेमाचं नाव आधी ‘मिशन रानीगंज : द ग्रेट इंडियन रेस्क्यू’ (Mission Raniganj The Great Indian Rescue) असं ठेवलं होतं. पण आता अभिनेत्याने सिनेमाच्या नावात बदल केला आहे. या सिनेमाचं नाव आता ‘मिशन रानीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू’ (Mission Raniganj The Great Bharat Rescue) असं ठेवलं आहे.

‘मिशन रानीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू’ या सिनेमाचा टीझर शेअर करत लिहिलं आहे,”1989 मध्ये एका व्यक्कीने अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली.या नाटकाची गोष्ट जाणून घेण्यासाठी 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात नक्की या”. परिणीती चोप्रानेही (Parineeti Chopra) या सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर केलं आहे. पण तिने भारत ऐवजी इंडियन लिहिलेलं आहे.

सत्य घटनेवर आधारित ‘मिशन रानीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू’ 

‘मिशन रानीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू’ हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. हा सिनेमा 1989 मध्ये कोळसा क्षेत्रात घडलेल्या एका वास्तविक घटनेवर आधारित आहे. या सिनेमात खिलाडी कुमार दिवंगत जसवंत सिंह गिल यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पुरात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यात जसवंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

तगडी स्टारकास्ट असलेला ‘मिशन रानीगंज : द भारत रेस्क्यू’ 

‘मिशन रानीगंज : द भारत रेस्क्यू’  या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा टीनू सुरेश देसाई यांनी सांभाळली आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar), परिणीती चोप्रा, पवन मल्होत्रा, कुमुद मिश्रा, रवी किशन आणि शिशिर शर्मा या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि अजय कपूर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

संबंधित बातम्या

Akshay Kumar : अक्षय कुमारने ‘OMG 2’ सिनेमासाठी एकही रुपये घेतला नाही; निर्मात्यांची माहिती



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *