indian bbl player nikhil chaudhary accused of raping australia women in his car and pleads not guilty

[ad_1]

Nikhil Chaudhary Rape Case : भारतीय वंशाच्या निखिल चौधरीवर ऑस्ट्रेलियामध्ये एका महिलेने गंभीर आरोप केले आहे. बिग बॅश क्रिकेटमध्ये विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या या भारतीय खेळाडूवर एका महिलेने अत्याचाराचे आरोप केले आहेत. कारमध्ये निखिल चौधरी यानं अत्याचार केल्याचा खळबळजनक आरोप त्या महिलेने केला आहे. एका पार्टीदरम्यान दोघांची ओळख झाली होती, त्यानंतर कारमध्ये निखिलने अतिप्रसंग केल्याचा आरोप महिलेने केला आहे. निखिल चौधरी याचं प्रकरण कोर्टात गेले. पीडित महिलेच्या मित्रांनी टाउन्सविले येथील न्यायालयात निखिल चौधरीच्या विरोधात साक्ष दिली. 27 वर्षीय निखील चौधरीने आपल्यावरील सर्व आरोपांचं खंडन केलेय. दोन वर्षांपासून कोर्टात हे प्रकरण सुरु आहे. मे 2021 मध्ये निखिल याच्यावर एका महिलेने अत्याचाराचे आरोप केले आहेत. निखिल चौधरी याने कारमध्ये महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप लगावल्यावर आला आहे. 

कोर्टाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी  आणि निखिल यांची दी बँक नाइट क्लबमध्ये डान्स फ्लोरवेळी भेट झाली होती. येथे दोघांनी डान्स केला, त्यानंतर चुंबनही घेतलं होतं. 20 वर्षीय मुलीने निखिल याच्यावर कारमध्ये रेप केल्याचा आरोप केला आहे. मुलीच्या मित्रांनीही निखिलविरोधात कोर्टात जबाब नोदंवलाय. दरम्यान, निखिल चौधरी हा मूळचा पंजाबचा आहे, तो सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन संघाकडो खेळतो. त्यानं ही स्पर्धा गाजवली आहे. 

कोरोनामध्ये गेला ऑस्ट्रेलियात… 

निखिल चौधरी हा मूळचा पंजाबमधील आहे. तो भारतात देशांतर्गत क्रिकेट खेळला आहे. त्यानं पंजाब संघाचं प्रतिनिघित्व केले. पण नंतर तो 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाला गेला. पण कोरोना महामारी आल्यानंतर तो त्याठिकाणीच अडकला. ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यानंतरही त्याने आपली क्रिकेटची आवड जपली. पोस्टमनची नोकरी करत करत तो क्रिकेटही खेळायचा. निखिलने ब्रिस्बेनच्या उत्तरेकडील उपनागरील एका क्रिकेट क्लबमध्ये त्याने दाखला घेतला. याच ठिकाणी त्याची गुणवत्ता सर्वांना समजली आणि नंतर होबार्ट हरिकेन संघाकडून बीबीएल 2023 मध्ये त्याची निवड झाली.

पीडितेच्या मित्रांचा गंभीर आरोप –

20 वर्षीय पीडित मुलीच्या मित्रांनी आज कोर्टात आपला जबाब नोंदवला. त्यांनी सांगितलं की, त्या दिवशी निखिल आणि पीडित मुलगी तीन वाजता कारमध्ये जाताना पाहिले. एका मुलाने सांगितले की, कारमधून खिडकी आदळण्याचाही आवज येत होता. अन्य एका साक्षीदारेन सांगितले की, पीडित मुलीला रडत बाहेर येताना पाहिले. पण क्रिकेटवटूने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 

निखिलची भारतामधील कामगिरी –

निखिल चौधरी यानं  देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाब संघाचं प्रतिनिधित्व केलेय. त्याने आतापर्यंत 2 लिस्ट एक आणि 21 टी20 सामने खेळले आहेत. लिस्ट ए च्या दोन सामन्यांमध्ये त्याने 25 धावा केल्या असून एक विकेट घेतली आहे. तर टी-20 मध्ये 16 डावांमध्ये 260 धावा केल्या आहेत आणि 12 विकेट्स त्याला घेतल्या आहेत.

अधिक पाहा..

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *