Indian squad for upcoming T20 World Cup to be announced soon; These 15 players are likely to get a chance

[ad_1]

Team India Predicted Squad For T20 World Cup 2024: सध्या क्रिकेट विश्वात IPL 2024 ची क्रेझ शिगेला पोहोचली आहे. इंडियन प्रीमियर लीगचा 17वा हंगाम 26 मे रोजी संपणार आहे. मात्र त्यानंतर अवघ्या 5 दिवसांनी आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 सुरू होणार आहे. 

आगामी विश्वचषकात भारतीय संघातून कोणत्या खेळाडूंना संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 4 सदस्यांची निवड समिती आयपीएल 2024 च्या सामन्यांवर सतत लक्ष ठेवून आहे. ते सामने थेट पाहण्यासाठी मैदानावरही पोहोचत असल्याची माहिती मिळत आहे. भारतीय संघाची निवड समिती लवकरच आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करणार असून पुढील 15 खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. 

टी-20 विश्वचषकासाठी संभाव्य भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन, रिंकू सिंह, मोहम्मद सिराज.

पुढील खेळाडूंचाही होऊ शकतो विचार:

केएल राहुल, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, मयंद यादव, शुभमन गिल, रियान पराग,अक्षर पटेल, रवी बिश्नोई, मुकेश कुमार

भारतीय संघ कधी जाहीर होणार?

पीटीआयनुसार, भारतीय संघाची निवड समिती आयपीएल 2024 चा पहिला टप्पा संपल्यानंतर 15 खेळाडूंचा संघ जाहीर करेल. तोपर्यंत निवडकर्त्यांना खेळाडूंच्या फॉर्मची कल्पना आली असेल. आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये पोहोचू न शकलेल्या संघातून निवडलेले खेळाडू लवकरच अमेरिकेला रवाना होईल. 

पात्र ठरलेले 20 संघ…

अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा 

गटवारी 

अ – भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब – इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क – न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड – दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ

भारतीय संघाचे वेळापत्रक

5 जून – वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
9 जून – वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
12 जून – वि. अमेरिका, न्यू यॉर्क
15 जून – वि. कॅनडा, फ्लोरिडा 

संबंधित बातम्या:

रोहित शर्माची भर मैदानात उतरली पॅन्ट…; पत्नी रितिकाची रिॲक्शन व्हायरल, Video एकदा पाहाच!

सामन्याआधी मिठी मारली, मग षटकार मारण्यासारखे चेंडू टाकले; भारतीय संघाच्या माजी कर्णधाराने उपस्थित केले प्रश्न

टी-20 विश्वचषकाच्या संघात शिवम दुबेला सामील न केल्यास त्याला CSK जबाबदार; माजी क्रिकेटपटूचं विधान

अधिक पाहा..

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *