[ad_1]
RCB Vs CSK: Virat Kohli: आयपीएलच्या 17 व्या हंगामाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिला सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने (Chennai SuperKings) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा ((Royal Challengers Bengaluru)) 6 विकेट्स राखून पराभव केला.
चेन्नईकडून न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रने आयपीएलमध्ये पदार्पण केले. रचिन रवींद्रने संघासाठी सर्वाधिक 37 धावा केल्या. या खेळीत आक्रमक फलंदाजी करत रचिन रवींद्रने 3 षटकार आणि 3 चौकार ठोकले. यानंतर आरसीबीचा फिरकीपटू कर्ण शर्माने त्याला झेलबाद केले. रचिन रवींद्र बाद झाल्यानंतर विराट कोहलीने आपल्या आक्रमत शैलीत त्याला डिवचले. पव्हेलियनच्या दिशेने बोट दाखवत कोहलीने काही अपशब्द वापरल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या खेळाडूला कोहलीने अशा पद्धतीने डिवचल्याने नेटकऱ्यांनी विराट कोहलीवर टीका केली आहे.
— Bangladesh vs Sri Lanka (@Hanji_CricDekho) March 22, 2024
मुस्तफिजुर रहमानच्या 4 विकेट्स-
प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 6 बाद 173 धावांची मजल मारल्यानंतर चेन्नईने 18.4 षटकांत 4 बाद 176 धावा केल्या. चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. त्याने 4 षटकांत 29 धावा देत 4 विकेट्स पटकावल्या.
कोहली आणि धोनीची घट्ट मैत्री-
कोहली आणि धोनी हे जिवलग मित्र आहेत. भारतीय संघासाठी एकत्र खेळताना त्यांच्यात एक घनिष्ठ मैत्री झाली. 2022 मध्ये जेव्हा त्याने धावांसाठी संघर्ष केला आणि कसोटी कर्णधारपदाचा त्याग केला तेव्हा त्याच्या कठीण काळात फक्त धोनीने विराटला कॉल केला होता. याबाबत स्वत: विराटने माहिती दिली होती. कोहलीने 2008 आणि 2019 दरम्यान 11 वर्षे धोनीसोबत ड्रेसिंग रूम शेअर केली. तो म्हणतो की धोनी, जो क्वचितच त्याचा फोन वापरतो, त्याने त्याच्या कठीण काळात त्याला दोनदा कॉल केला आणि काही महत्त्वाचा सल्ला दिल्याचे, असं विराटने सांगितले होते.
MS Dhoni 🤗 Virat Kohli
These two are a VIBE! ☺️#TATAIPL | #CSKvRCB | @msdhoni | @imVkohli | @ChennaiIPL | @RCBTweets pic.twitter.com/whjKAk8j0L
— IndianPremierLeague (@IPL) March 22, 2024
पहिल्या विजयानंतरही ऋतुराज नाखुश?
आम्ही पहिल्यापासून नियंत्रणात होतो. सर्वांनी चांगला खेळ केला. आरसीबीचा ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डुप्लेसिस लवकर माघारी पाठवल्याने संघाला फायदा झाला. आम्हाला तीन झटपट विकेट मिळाल्या आणि त्यामुळे आम्हाला पुढील षटकांवर नियंत्रण ठेवण्यात मदत झाली, हाच खरा टर्निंग पॉइंट होता. मी कर्णधारपदाचा आनंद लुटला. अतिरिक्त दबाव म्हणून मला कधीच वाटले नाही. मला ते कसे हाताळायचे याचा अनुभव आहे. मला कधीही दबाव जाणवला नाही, अर्थातच माही भाई देखील होता, असं ऋतुराजने सांगितले. ऋतुराज पुढे म्हणाला की, आमच्या संघातील प्रत्येकजण नैसर्गिक स्ट्रोकप्लेअर आहे, असं मला वाटतं. जिंक्स (अजिंक्य रहाणे) देखील खरोखर सकारात्मक खेळत आहे. प्रत्येकाला त्यांची भूमिका आणि कोणत्या गोलंदाजांना सामोरे जायचे हे माहित आहे. दोन-तीन गोष्टींवर काम करायचे आहे, प्रत्येकाने चांगली फलंदाजी केली. पण मला वाटते की पहिल्या 3 मधील फलंदाजांनी 15 व्या षटकापर्यंत फलंदाजी केली तर ते आणखी सोपे झाले असते.
अधिक पाहा..
[ad_2]
Source link