[ad_1]
IPL 2024 Sunil Gavaskar On Virat Kohli: आयसीसी टी-20 विश्वचषकापूर्वी विराट कोहलीला (Virat Kohli) त्याच्या आयपीएलमधील स्ट्राईक रेटमुळे प्रचंड ट्रोल केले जात आहे. यानंतर विराट कोहलीने देखील टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले होते. कोहलीच्या या विधानावर आता भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी टीका केली आहे.
सुनील गावसकर बंगळुरु आणि गुजरातचा होणाऱ्या सामन्याआधी म्हणाले की, जर तुम्ही त्याकडे लक्ष देत नसल्याचा दावा करत असाल तर तो बाहेरच्या बोलण्याला का प्रतिसाद देत आहे. तुम्ही जेव्हा या सगळ्यांना सांगता की मी बाहेरच्या बोलण्याची पर्वा करत नाही, अहो. मग तुम्ही बाहेरच्या बोलण्याला का उत्तर देताय. आम्ही जे काही पाहतो त्याबद्दल आम्ही बोलतो. तुमचा स्ट्राइक 118 असेल आणि मग तुम्ही 118 च्या स्ट्राइक-रेटसह 14व्या किंवा 15व्या षटकात बाद होत असाल, तर ते चुकीचे आहे, अशा शब्दात सुनील गावसकर यांनी कोहलीला सुनावले.
Sunil Gavaskar’s response to Virat Kohli’s msg to the critics!
What are your views?#RCBvGTpic.twitter.com/9XTQI9I9HN
— Pritesh (@priteshpdedhia) May 4, 2024
विराट कोहली काय म्हणाला होता?
लोक कितीही बोलत असले तरी संघाला विजय मिळवून देणे हेच माझे ध्येय असल्याचं कोहलीने सांगितले. स्ट्राईक रेटबद्दल आणि फिरकीला नीट खेळू न शकणारे लोकच या गोष्टी बोलत आहेत. संघाला जिंकण्यासाठी मदत करणे हेच माझे ध्येय आहे आणि म्हणूनच मी माझ्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी दररोज हे करू शकलो, मला माहित नाही की या लोकांनी अशा परिस्थितीचा सामना केला आहे, असं विराट कोहलीने सांगितले.
गौतम गंभीर काय म्हणाला?
प्रत्येक खेळाडूच्या खेळण्याची शैली ही वेगवेगळी असते. खेळाडूंच्या स्ट्राईक रेटपेक्षा संघाचा विजय महत्वाचा असतो. विराट कोहली एक वेगळा खेळाडू आहे. त्यामुळे जे काम ग्लेन मॅक्सवेल करु शकतो, ते काम विराट कोहली करु शकत नाही आणि जे काम विराट कोहली करु शकतो, ते काम ग्लेन मॅक्सवेल करु शकत नाही, असं गौतम गंभीरने म्हणाला.
संबंधित बातम्या:
मुंबई इंडियन्सच्या पराभवापेक्षा सारा तेंडुलकरची चर्चा; वानखेडे मैदानावरील फोटो होतोय व्हायरल
अधिक पाहा..
[ad_2]
Source link