IPL 2024: Virat Kohli bowing down to Dinesh Karthik after receiving the Orange Cap

[ad_1]

IPL 2024 Virat Kohli: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा (GT) पराभव केला. आरसीबीने हा सामना 4 विकेट्सने जिंकला. विराट कोहलीने (Virat Kohli) चांगली कामगिरी करत 42 धावांची खेळी खेळली. या खेळीच्या जोरावर कोहलीने पुन्हा एकदा आयपीएल ऑरेंज कॅप पटकावली. कोहलीने ही ऑरेंज कॅप (Orange Cap) त्याचा सहकाही आणि बंगळुरुचा विकेटकीपर दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) हस्ते स्वीकारली. यावेळी कोहलीच्या एका कृतीने सर्वांचं मन जिंकलं आहे.

आरसीबीच्या विजयानंतर दिनेश कार्तिकने कोहलीला ऑरेंज कॅप घालायला लावली. ऑरेंज कॅप घातल्यानंतर कोहलीने दिनेश कार्तिकचा आदर केला. कार्तिकपुढे नतमस्तक होऊन नमस्कार केला. कोहलीची ही शैली चाहत्यांना खूप आवडली. त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. कोहलीने याआधी अनेक वेळा वरिष्ठ खेळाडूंचा मान वाढवला आहे.

विराट कोहलीकडे ऑरेंज कॅप-

कोहलीकडे सध्या आयपीएल 2024 ची ऑरेंज कॅप आहे. त्याने 11 सामन्यात 542 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 1 शतक आणि 4 अर्धशतके केली आहेत. कोहलीची सर्वोत्तम धावसंख्या म्हणजे नाबाद 113 धावा. या मोसमात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत ऋतुराज गायकवाड दुसऱ्या स्थानावर आहे. चेन्नईच्या कर्णधाराने ऋतुराजने 10 सामन्यात 509 धावा केल्या आहेत. त्याने 1 शतक आणि 4 अर्धशतके झळकावली आहेत.

गुजरातचा डाव अवघ्या 147 धावांवर गुंडाळला-

नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सचा डाव 19.3 षटकांत सर्वबाद 147 धावांवर आटोपला. गुजरात टायटन्सकडून शाहरुख खानने सर्वाधिक 37 धावा केल्या. याशिवाय राहुल तेवतियाने 35 आणि डेव्हिड मिलरने 30 धावांचे योगदान दिले. आरसीबीकडून मोहम्मद सिराजशिवाय यश दयाल आणि विजयकुमार वशाक यांनी 2-2 विकेट्स घेतल्या. करण शर्मा आणि कॅमेरून ग्रीन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

गुणतालिकेची काय स्थिती?

गुजरातविरुद्धच्या या विजयानंतर आरसीबीचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आला आहे. आरसीबीने आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत आणि 4 जिंकले आहेत. राजस्थान रॉयल्स अव्वल स्थानावर आहे. राजस्थानने 10 सामने खेळले असून 8 जिंकले आहेत. त्याचे 16 गुण आहेत. कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या स्थानावर आहे. कोलकाताने 10 सामने खेळले असून 7 जिंकले आहेत. त्याचे 14 गुण आहेत. लखनौ सुपर जायंट्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबाद आहे. तर चेन्नई सुपर किंग्स पाचव्या क्रमांकावर आहे.

संबंधित बातम्या:

Sunil Gavaskar On Virat Kohli: ‘अरे मग तु उत्तर का देतोस’?; विराट कोहलीच्या विधानावर सुनील गावसकर संतापले, पाहा Video

Hardik Pandya: हार्दिक पांड्याची मोठी चूक झाली…; शेन वॉटसन अन् ग्रॅमी स्मिथने सुनावलं, सगळं बोलून टाकलं!

अधिक पाहा..



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *