[ad_1]
Jailer: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत (Rajnikanth) यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘जेलर’ (Jailer) आज (10 ऑगस्ट) देशभरात रिलीज होत आहे. हा चित्रपट तमिळ भाषेतील असून तेलुगू आणि हिंदीमध्ये डब करण्यात आला आहे. रजनीकांत यांचा हा चित्रपट रिलीज होताच चाहत्यांनी थिएटरबाहेर गर्दी केली आहे. सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये रजनीकांत यांचे चाहते थिएटर बाहेर आणि जेलर चित्रपटाचा शो सुरु असताना जल्लोष करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
#JailerFDFS #Jailer tremendous excitement for @rajinikanth starrer at MovieMax, Sion pic.twitter.com/0KH4OT79tC
— Fenil Seta (@fenil_seta) August 10, 2023
#WATCH | Tamil Nadu: Fans of superstar Rajinikanth celebrate outside theatres across Chennai, on the release of his film ‘Jailer’ pic.twitter.com/N8qa44ytHB
— ANI (@ANI) August 10, 2023
#JailerFDFS
This is Not TN this is #Bangalore 🔥🔥💪Tharamaana Sambhavam 🕴️❤️💯#Jailer #JailerFDFS #JailerBlockbuster #Thalaivar #SuperstarRajinikanth pic.twitter.com/msewxQHOXv
— ONLINE RAJINI FANS🤘 (@OnlineRajiniFC) August 10, 2023
नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित आणि सन पिक्चर्सच्या बॅनरखाली बनलेल्या ‘जेलर’ या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबतच मोहनलाल, जॅकी श्रॉफ, रम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, विनायकन आणि योगी बाबू या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
एका रिपोर्टनुसार, चेन्नई आणि बंगळुरूमधील काही कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्यांसाठी 10 ऑगस्ट रोजी ‘जेलर’च्या रिलीजच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. जेलर चित्रपटाच्या माध्यमातून रजनीकांत हे दोन वर्षांच्या ब्रेकनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहेत.
‘जेलर’ मधील गाण्यांना मिळाली पसंती
‘जेलर’ या चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या चित्रपटामधील कावाला हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड झालं. या गाण्यावरील रिल्सचे व्हिडीओ अनेक नेटकऱ्यांनी तसेच सेलिब्रिटींनी शेअर केले. या गाण्यामधील तमन्नाच्या डान्सला नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळाली. तसेच रथामारे,जुजुबी ही गाणी देखील या चित्रपटांमध्ये आहेत.
नेटकऱ्यांनी शेअर केले रिव्ह्यू
अनेक नेटकरी सोशल मीडियावर जेलर या चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर करत आहेत. चित्रपटामधील रजनीकांत यांची एन्ट्री, बॅग्राऊंड म्युझिक यांचं कौतुक नेटकरी करत आहेत.
The film’s background score by Anirudh Ravichander perfectly complement the narrative. 🔥
Yogi Babu & Rajini scenes work effectively🙌
Thalaivarrr entry, bgm And Interval block 🔥
Overall Blockbuster Movie 🔥🔥
— Ashok choudhary (@Astraeus_45) August 10, 2023
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
.
[ad_2]
Source link