Japanese Couple Travelled From Osaka To Tamil Nadu Watch Rajinikanth New Film Jailer

[ad_1]

Rajinikanth Jailer Movie: अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांचा  जेलर (Jailer) चित्रपट आज (10 ऑगस्ट) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर गर्दी केली आहे. सध्या जेलर हा चित्रपट पाहण्यासाठी चेन्नईमध्ये आलेल्या एका जपानी जोडप्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. हे जोडपं जपानमधील ओसाका या शहरामधून चेन्नईमध्ये जेलर हा चित्रपट पाहण्यासाठी आलेलं आहे.

रजनीकांत यांचे चाहते देशातच नाही तर पदेशात देखील आहेत. जपानमधील (Japan) ओसाका येथे राहणारा (Osaka) यासुदा हिदेतोशी (Yasuda Hidetoshi) आणि त्याची पत्नी रजनीकांत यांचा जेलर चित्रपट पाहण्यासाठी चेन्नईला पोहोचले आहेत. PTI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये यासुदा हिदेतोशीनं सांगितलं, ‘जेलर चित्रपट पाहण्यासाठी आम्ही जपानहून चेन्नईला आलो आहोत’ यासुदा हिदेतोशी  आणि त्याच्या पत्नीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ:

‘जेलर’ ची स्टार कास्ट

‘जेलर’ या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबतच  मोहनलाल, जॅकी श्रॉफ, रम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, विनायकन आणि योगी बाबू या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. जेलर हा चित्रपट आज (10 ऑगस्ट) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित ‘जेलर’ या चित्रपटाद्वारे रजनीकांत यांनी दोन वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले. या चित्रपटामधील  ‘कावला’ आणि ‘हुकुम’ या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. ‘कावला’ या गाण्यावरील डान्सचे व्हिडीओ अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर शेअर केले.

नेटकऱ्यांनी केलं ‘जेलर’चं कौतुक

अनेक नेटकरी सोशल मीडियावर रजनीकांत यांच्या जेलर या चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर करत आहेत. चित्रपटामधील रजनीकांत यांची एन्ट्री, बॅग्राऊंड म्युझिक यांचं  कौतुक नेटकरी करत आहेत. 

रोबोट, शिवाजी द बॉस आणि चंद्रमुखी या रजनीकांत यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता रजनीकांत यांचा जेलर  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Jailer: रजनीकांत यांचा ‘जेलर’ झाला रिलीज; प्रेक्षकांचा थिएटरबाहेर जल्लोष, पोस्टरला केला दुधाचा अभिषेक, व्हिडीओ व्हायरल

 

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *