[ad_1]
Jasprit Bumrah is back….: भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये आजपासून टी 20 मालिकेला सुरुवात झाली आहे. भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराह याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अतिशय योग्य होता, कारण, आयर्लंडचा अर्धा संघ 50 धावांच्या आत तंबूत परतला होता. यामध्ये बुमराहचे योगदानही मोठं होतं. बुमराहने जवळपास वर्षभरानंतर भारतीय संघात कमबॅक केलेय. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा होत्या. त्याने पहिल्याच षटकात दोन फलंदाजांना तंबूत पाठत दणक्यात कमबॅक केलेय. बुमराहच्या भेदक माऱ्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
आशिया चषक आणि विश्वचषकाआधी जसप्रीत बुमराह तंदुरुस्त होणं, भारतासाठी महत्वाचे होते. फिट झालेल्या बुमराहला आयर्लंड दौऱ्यात कर्णधार म्हणून पाठवण्यात आले. बुमराहने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाल. बुमराहने पहिल्याच षटकात भेदक मारा करत सर्वांचं लक्ष वेधले. बमराहने पहिल्या षटकात फक्त 4 धावा देत दोन विकेट घेतल्या. बुमराहने एंड्रयू बालबर्नी आणि लोरकन टकर यांना तंबूचा रस्ता दाखवला. बालबर्नी याने बुमराहच्या पहिल्यांच चेंडूवर चौकार मारत आपले इरादे स्पष्ट केले. पण बुमराह याने पुढच्याच चेंडूवर बालबर्नी याला त्रिफालाचीत बाद करत हिशोब चुकता केला. बुमराहने टाकलेला अप्रतिम चेंडू बालबर्नी याला समजलाच नाही. बुमराहचा चेंडू बालबर्नी याच्या बॅटची कड घेऊन गेला. त्यानंतर तिसरा आणि चौथा चेंडू बुमराहने निर्धाव टाकला. पाचव्या चेंडूवर लोरकन टकर संजूकरवी झेलबाद केले.
Jasprit Bumrah is back….!!!!
India cricket is back, Indian cricket fans are happy.
A champion in this generation. pic.twitter.com/0oOlGlSevl
— Johns. (@CricCrazyJohns) August 18, 2023
Bumrah in his first over:
4, W, 0, 0, W, 0
Best in the business forever in India. pic.twitter.com/6vcp9TAhsO
— Johns. (@CricCrazyJohns) August 18, 2023
बुमराहने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी
भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराह याने आयर्लंड विरोधात नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान आयर्लंडचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरले. रिंकू सिंह आणि प्रसिद्ध कृष्णा यांचे आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये भारतीय संघात पदार्पण झालेय. दरम्यान, भारताच्या टी 20 क्रिकेटच्या इतिहासात जसप्रीत बुमराह पहिलाच कर्णधार आहे, जो गोलंदाज आहे. याआधीचे सर्व कर्णधार फलंदाज अथवा अष्टपैलू खेळाडू राहिलेत.
भारताची प्लेईंग 11 –
ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयसवाल, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंह, शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह (कर्णधार), रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा
[ad_2]
Source link