Jaya Bachchan Angry Expression In Dhindhora Baje Rocky Aur Rani Ki Prem Kahaani Song

[ad_1]

Jaya Bachchan Expression: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणवीर सिंह  (Ranveer Singh) यांचा चित्रपट  रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Ki Prem Kahaani) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला असून या चित्रपटामधील काही गाणीही रिलीज झाली आहेत. नुकतेच या चित्रपटातील  ‘ढिंढोरा बाजे रे’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे, या गाण्यामध्ये आलिया आणि रणवीरचा जबरदस्त डान्स बघायला मिळत आहे. पण या गाण्यातील जया बच्चन यांचे एक्सप्रेशन्सनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

नेटकऱ्यांचे ट्विट्स

‘ढिंढोरा बाजे रे’ या  गाण्यातील जया बच्चन यांच्या एक्सप्रेशन्सचा स्क्रीनशॉट  ट्विटरवर शेअर करुन, एका नेटकऱ्यानं लिहिलं, ‘एवढं पण खरं दिसायचं नव्हतं’. तर दुसऱ्या युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं- ‘संपूर्ण गाण्यात जया बच्चन अशाच दिसल्या आहेत.’ काही नेटकऱ्यांनी मिम्स देखील शेअर केले आहेत. 

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामधील तुम क्या मिले  आणि व्हॉट झुमका ही गाणी रिलीज झाली. या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. आता ‘ढिंढोरा बाजे रे’ या गाण्याला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.


‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंह, अभिनेत्री आलिया भट्ट, जया बच्चन, धर्मेंद्र, क्षिती जोग, शबाना आझमी हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.  कौटुंबिक नाट्य, रोमान्स, डान्स, भावना, संगीत  या सर्व गोष्टी या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहेत, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटात आलिया आणि रणवीरची जोडी पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

संबंधित बातम्या

Rocky Aur Rani Ki Prem Kahaani: आलिया आणि रणवीरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ वर सेन्सॉर बोर्डाची कात्री; ‘हे’ शब्द बदलले



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *