[ad_1]
K. Chandrashekar Rao in Maharashtra : राज्याच्या राजकारणात नव्याने एन्ट्री करणाऱ्या बीआरएस पक्षाची जोरदार चर्चा असून, आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने या पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. तर पक्षाचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर अनेक सभा घेत पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहे.
के चंद्रशेखर राव हे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. के चंद्रशेखर राव हे उद्या (01 ऑगस्ट) रोजी सकाळी दहा वाजता कोल्हापूरमध्ये पोहचणार आहे. वाटेगावमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहे. सोबतच ते शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांच्या घरी जाणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.
[ad_2]
source