Kangana Ranaut Reviews Oppenheimer Movie Share Video On Social Media

[ad_1]

Kangana Ranaut Reviews Oppenheimer:  ‘ओपनहाइमर’ (Oppenheimer) या चित्रपटाचं सध्या देशभरात कौतुक होत आहे. ख्रिस्तोफर नोलन (Christopher Nolan) दिग्दर्शित  या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. ओपनहाइमर या चित्रपटाचं अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक करत आहेत. नुकताच अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) देखील एक खास व्हिडीओ शेअर करुन ओपनहाइमर या चित्रपटाचं  कौतुक केलं आहे.

कंगनानं शेअर केला व्हिडीओ:

कंगनानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती कारमध्ये बसलेली दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती व्हाईट टॉप, मोकळे केस आणि न्यूड मेकअप अशा लूकमध्ये ती दिसत आहे. कंगना या व्हिडीओमध्ये म्हणते, ‘मित्रांनो, मी ओपनहाइमर  चित्रपट पाहून आले  आहे. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेसाठी अणुबॉम्ब बनवणाऱ्या भौतिकशास्त्रज्ञाची ही कथा आहे.’

कंगनानं या व्हिडीओला कॅप्शन दिलं,  ‘ख्रिस्तोफर नोलनचे आतापर्यंतचे सर्वोत्तम काम . हा आपल्या काळातील सर्वात महत्वाचा चित्रपट आहे.मी खूप एक्सायडेट आहे. या चित्रपटात मला मनापासून आवडत असलेले सर्व काही आहे, मला भौतिकशास्त्र आणि राजकारणाची आवड आहे. माझ्यासाठी हे सिनेमॅटिक ऑर्गेझम सारखे होते. अप्रतिम!! P.s. वरील व्हिडीओबाबतीत आत्ताच लक्षात आले की, मला असे म्हणायचे आहे की, राष्ट्रीयतेऐवजी राष्ट्रवाद वाढतो.’ कंगनाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. 

पाहा व्हिडीओ:

कंगनाचे आगामी चित्रपट

कंगनाचा (Kangana Ranaut) धडक हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला. आता कंगना ही तीन आगामी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ती तेजस, इमर्जन्सी आणि चंद्रमुखी 2 या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. कंगनाच्या या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

कंगनाचे एक प्रॉडक्शन हाऊस देखील आहे. तिच्या प्रोडक्शन हाऊसचा टिकू वेड्स शेरू हा पहिला चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा  चित्रपट   Amazon Prime या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर मुख्य भूमिकेत आहेत.  

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Oppenheimer : ‘ओपनहाइमर’ने जगभरात केली 2000 कोटींपेक्षा अधिक कमाई! जाणून घ्या सात दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन…

 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *