Kedar Shinde Baipan Bhaari Deva Marathi Director Kedar Shinde Honored With Majha Sanman Award 2023 Entertainement

Kedar Shinde Baipan Bhaari Deva Marathi Director Kedar Shinde Honored With Majha Sanman Award 2023 Entertainement

[ad_1]

Kedar Shinde : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शिक केदार शिंदे (Kedar Shinde) सध्या ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासोबत हा सिनेमा प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला आहे. नाटक, मालिका आणि सिनेमा अशा तीनही माध्यमांमध्ये केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी आपल्या जबरदस्त दिग्दर्शकीय आणि लेखन कौशल्याने उत्तमोत्तम कलाकृती निर्माण केल्या आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना ‘माझा सन्मान’ (Majha Sanman 2023) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

नाटक असो, सिनेमा असो किंवा मग मालिका..केदार शिंदे यांच्या कलाकृतीने रसिकांचं हमखास आणि दिलखुलास मनोरंजन केलं आहे. श्रीमंत दामोदरपंत… एव्हरग्रीन ‘सही रे सही’… छोट्या पडद्यावरचे प्रेमात पाडणारे ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’… हाऊसफुल्लचे बोर्ड लावणारा ‘अगं बाई अरेच्चा’ ते आजही थिएटरमध्ये कोट्यवधींची कमाई करत असलेला ‘बाईपण भारी देवा’ हा केदार शिंदे यांच्या कलाजीवनाचा प्रवास जितका यशस्वी तितकाच संघर्षपूर्ण होता.

केदार शिंदे यांचं कधी कौतुक झालं तर कधी अपयश आलं. पण काम करत राहणं हे त्यांनी कधी सोडलं नाही. रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या, सिनेमाला श्वास मानणाऱ्या आणि बाईपण खरंच कळलेल्या भारी केदारला ‘एबीपी माझा’चा सलाम…

केदार शिंदेंना ‘माझा सन्मान’ पुरस्काराने सन्मानित 

केदार शिंदे यांना ‘माझा सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलं आहे,”या शनिवारी रात्री ८ वाजता @abpmajhatv वर ” माझा सन्मान पुरस्कार सोहळा” पाहायला विसरू नका. 2023 ची दमदार सुरूवात!!! तुमच्या प्रेमामुळेच हे घडतय. मायबाप प्रेक्षक हो… असाच कौतुकाचा आशिर्वाद पाठीवर ठेवा. #श्रीस्वामीसमर्थ”. केदार शिंदे यांच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

केदार शिंदे यांच्यासह अमेरिकेतील पहिले मराठी खासदार श्री ठाणेदार, क्रिकेटर शार्दुल ठाकूर, अभिनेत्री श्रद्धा कपूर, साहित्यिक-संशोधक सुरेश वाघे, कीर्तनकार सत्यपाल महाराज, वारे गुरुजी, गायक सुरेश वाडकर, संगीतकार अशोक पत्की यांनादेखील एबीबी माझाच्या ‘माझा सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

कुठे पाहाल ‘एबीपी माझा सन्मान 2023’?

एबीपी माझाकडून देण्यात येणारा ‘माझा सन्मान’ 2023 पुरस्कार सोहळा तुम्ही एबीपी माझावर पाहू शकणार आहात. 26 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 8 वाजता आणि 27 ऑगस्ट रोजी  संध्याकाळी 7 वाजता या सोहळ्याचे प्रक्षेपण ‘एबीपी माझा’ वाहिनीवर होणार आहे. 

संबंधित बातम्या

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *