Kedar Shinde Share Post About Ashok Mule On Instagram

Kedar Shinde Share Post About Ashok Mule On Instagram

[ad_1]

Kedar Shinde: दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा ‘बाई पण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. केदार शिंदे हे सध्या या चित्रपटाविषयी वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत आहेत. नुकतीच केदार शिंदे यांनी   अशोक मुळे यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

केदार शिंदे यांची पोस्ट

केदार शिंदे  यांनी  अशोक मुळे यांच्यासोबतचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘सहजच वाटलं म्हणून लिहितोय. हे श्री. अशोक मुळे. त्यांना आमच्या नाट्य क्षेत्रातील अनेक लोकं पांढरे मुळे असही म्हणतात!! 365 दिवस, रात्र ते फक्त पांढऱ्या कपड्यात असतात. त्यांच्या चारित्र्यावर आणि कपड्यावर डाग मी तरी पाहिला नाही. अनेक वेगवेगळे उपक्रम ते करत असतात. त्यासाठी कुणा कुणाला भेटून निस्वार्थ पणे उपक्रम तडीस लावतात. सही रे सही नाटकाला आज 21 वर्षे पुर्ण झाली. ते नाटक जेव्हा आलं तेव्हा मुळेकाका आमच्या पाठीशी होते. वर्तमानपत्रात जी नवनविन जाहिरात संकल्पना यायची ती यांच्याच डोक्यातून!!’

पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, ‘बाईपण भारी देवा या सिनेमाच्या यशानंतर नुकतीच त्यांची भेट झाली. प्रेमाने तरी टोमणा मारून ते मला काहीतरी बोललेच. पण खर सांगू? ते एकमेव असतील ज्यांना उलट उत्तर देण्याची मला इच्छा होत नाही. कारण त्यांनी तो मान माझ्या मनात निर्माण केला आहे. कदाचित ते Instagram वर नसतीलच. ज्यांना जमेल त्यांनी ही पोस्ट त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. आपल्या आयुष्यात अशी माणसं असतात.. त्यांना जपायचे असतं. कारण त्यांच्या असण्याने आपलं आयुष्य समृद्ध होतं.’

केदार शिंदे यांच्या पोस्टला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘अगदी खरं. कौतुक करावं तर त्यांनीच. टीका करतील तीही पोटतिडकीने. पण इतकं निर्मळ मन त्यांच्या कपड्यांप्रमाणेच,की ती टीकाही गोड वाटावी.’

बाईपण भारी देवा या चित्रपटाच्या यशानंतर आता केदार शिंदे यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

संंबंधित बातम्या

Baipan Bhaari Deva: ‘सध्या दोनच अजितदादा चर्चेत आहेत. एक पवारांचे आणि दुसरे आमचे!’; केदार शिंदे यांनी शेअर केली खास पोस्ट

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *