Kids Care : आला उन्हाळा, नवजात मुलं आजारी पडण्याची शक्यता, ‘अशी’ घ्याल काळजी, तर होईल रक्षण!

[ad_1]

Kids Care : देशात (India) अनेक ठिकाणी उष्णतेचा (Summer) पारा वाढताना दिसत आहे. अनेक राज्यात तर उष्णतेने आपले भयंकर रूप दाखवायला सुरुवात केली आहे. अशात लहान मुलांची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. कारण बदलत्या हवामानात लहान मुलं सहज आजारी पडण्याची शक्यता असते. परंतु मुलांची योग्य काळजी घेतल्यास त्यांचे उष्णतेपासून तसेच आजारांपासून रक्षण होऊ शकते. जाणून घ्या पाच पद्धती…

 
प्रौढांच्या तुलनेत लहान मुलं लवकर आजारी पडू लागतात

उन्हाळा आला आहे. आता हळूहळू उष्णतेने उग्र रूप धारण केले आहे. अशात लहान बाळांच्या आरोग्याची काळजी घेणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. प्रौढांच्या तुलनेत बदलत्या हवामानात मुलं लवकर आजारी पडू लागतात. उन्हाळ्यात लहान मुलांना अतिसार आणि उष्माघाताचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे लहान मुलांची काळजी घेणे थोडे अवघड जाते. याच बदलत्या हवामानात आपल्या मुलाची काळजी कशी घ्यावी? हे पालकांनी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे, जेणेकरून ते आजारी पडण्याची शक्यता कमी असेल. जाणून घेऊया लहान मुलांची उष्णतेपासून तसेच आजारांपासून मात करण्यासाठी कशी काळजी घेतली जाऊ शकते?

उन्हात बाहेर जाणे टाळा

तुम्ही पाहिलं असेल, की सकाळी 10 पासून ते दुपारी 4-5 वाजेपर्यंत तीव्र सूर्यप्रकाशाची झळ असते. अशावेळी लहान मुलांना बाहेर घेऊन जाणे जोखमीचे ठरेल. यामुळे मुलांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे तीव्र उन्हाचे चटके लागत असतानाच लहान मुलांना चुकूनही घराबाहेर काढू नका. त्यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन ते लवकर आजारी पडू शकतात. तुम्ही बाहेर जात असाल तरीही पूर्ण बाह्यांचे कपडे घाला, चेहऱ्याचे संरक्षण करण्यासाठी टोपी घाला आणि उन्हापासून बचाव करण्यासाठी छत्री ठेवा.

 

हलके आणि सुती कपडे घाला

उन्हाळ्यात आधीच घामाच्या धारा वाहत असतानाच अनेक पालक आपल्या मुलांना भरपूर कपडे घालायला लावतात. यामुळे मुले अस्वस्थ होऊ लागतात आणि त्यांना आराम वाटत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात मुलांनी हलक्या रंगाचे आणि सुती कपडेच घालावेत. या ऋतूत मुलांना खूप थरांचे कपडे घालायला लावू नका.

 

आहारात काय द्यावे?

 उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. उष्णतेमुळे लहान मुलांनाही डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत लहान मुलांना पाण्याव्यतिरिक्त आईचे दूधही द्यावे. यामुळे त्यांना आजारांशी लढण्याची ताकदही मिळेल.

 

झोपण्याची योग्य वेळ

तुमचे मूल जेथे झोपते किंवा बहुतेक वेळ ज्या ठिकाणी घालवते ते ठिकाण आरामदायक तसेच थंड ठेवा. सॅटिन किंवा गरम चादरीमुळे मुलाचे शरीर लवकर गरम होईल, अशा परिस्थितीत, कॉटनचे कपडे निवडणे चांगले आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलासाठी स्ट्रॉलर खरेदी करता तेव्हा त्याच्या फॅब्रिककडेही लक्ष द्या. त्याचे कापड नायलॉनसारखे हलके फॅब्रिकचे असावे.

 

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

संबंधित बातम्या

Travel : एप्रिल-मे मध्ये कमी खर्चात फिरा बिनधास्त! IRCTC पॅकेजस पाहताच प्लॅन बनवाल फटाफट, एकाच वेळी अनेक ठिकाणी भेट देण्याची संधी

 

 

 

 

 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *