Kirit Somayya Notice To Ambadas Danave 18 Pages Shiv Sena Vs BJP Maharashtra Political Updates

[ad_1]

Aurangabad News : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांना भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी 18 पानांची नोटीस पाठवली आहे. दानवे यांच्या कार्यालयात ही नोटीस आली असल्याची माहिती दानवे यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी सोमय्या यांचा एक व्हिडीओ व्हायारल झाला होता. त्यानंतर ते बॅक फुटवर गेल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, आता सोमय्या पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत असून, त्यांनी पहिला ‘वार’ दानवे यांच्यावर केल्याचे पाहायला मिळत आहे. 

याबाबत बोलतांना अंबादास दानवे म्हणाले आहे की, मला संध्याकाळी एक पत्र आल्याचे माझ्या कार्यालयाकडून कळाले. हे पत्र किरीट सोमय्या यांचे असल्याचे कळाले. मात्र, त्यात काय मजकूर आहे हे मी वाचलेलं नाही. परंतु याला मी काही घाबरणार नाही, मी शिवसेनाप्रमुखांचा शिवसैनिक आहे. जे काही असेल त्याला सडेतोड उत्तर देऊ, शिवसेनेच्या भाषेत उत्तर देऊ, असे अंबादास दानवे म्हणाले आहेत. 

काय आहे प्रकरण? 

किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. दरम्यान, यावरून सोमय्या यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आल्या होत्या. तर, अंबादास दानवे यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत, सोमय्यांवर गंभीर आरोप केले होते. तसेच, सोमय्यांनी महिनाभरापूर्वीच अनेक महिलांनी संपर्क केल्याचा दावा दानवेंनी केला होता. सोबतच, सभागृहात पेनड्राईव्ह सादर करत या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. दरम्यान, आता याच प्रकरणी सोमय्या यांनी दानवे यांना नोटीस पाठवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकूण 18 पानांची ही नोटीस असून, यातील मजकूर मात्र अजून कळू शकला नाही. 

चार दिवसांपूर्वी घेतली होती गुप्त भेट…

विशेष म्हणजे, चार दिवसांपूर्वीच सोमय्या अचानक औरंगाबादमध्ये दाखल झाले होते. तसेच, यावेळी त्यांनी एक गुप्त बैठक देखील घेतली. विशेष म्हणजे, शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे नामांकित सीए उपेंद्र मुळे यांची सोमय्यांनी भेट घेतली होती. सोमय्या अचानक बुधवारी रात्री औरंगाबादमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी भावना गवळी यांचे माजी सीए उपेंद्र मुळे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. विशेष म्हणजे सोमय्या यांची अचानक झालेल्या या भेटीची कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. तर सोमय्या यांनी ज्यांची भेट घेतली ते सीए उपेंद्र मुळे भावना गवळी यांच्यावर करण्यात आलेल्या ईडी प्रकरणावेळी चर्चेत आले होते.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Kirit Somaiya in Aurangabad : पवारांच्या भेटीनंतर राज्यात आणखी एका गुप्त बैठकीची चर्चा; पाहा कोण कुणाला कुठं भेटलं?

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *