Kishor Kadam Indian Actor And Poet Kishor Kadam Mumbai Pune Expressway Toll Charges Shared Experience On Social Media Nitin-gadkari

Kishor Kadam Indian Actor And Poet Kishor Kadam Mumbai Pune Expressway Toll Charges Shared Experience On Social Media Nitin-gadkari

[ad_1]

Kishor Kadam : किशोर कदम (Kishor Kadam) उर्फ सौमित्र सध्या चर्चेत आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) विनाकारण दोन वेळा टोल घेत असल्याने राजकीय मंडळी, सेलिब्रिटींसह सर्वसामान्य मंडळींना याचा फटका बसत आहे. सेलिब्रिटी मंडळींना अनेकदा मुंबई-पुणे असा प्रवास करावा लागतो. प्रत्येकवेळी हा प्रवास करताना त्यांना खिशाला कात्री बसत आहे. आता किशोर कदम यांनी पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. 

कवी सौमित्र यांची संतप्त पोस्ट (Kishor Kadam Post On Mumbai-Pune Expressway)

किशोर कदम यांनी लिहिलं आहे,”मुंबईहून पुण्याला जाताना एक्सप्रेस हायवेवर 240 रुपये टोल घेतात..मध्ये मन:शांती वगैरेमध्ये काही खायला लोणावळ्यात उतरलं की वर हायवेवर पुन्हा आल्यावर पुन्हा 240 का घेतात? टोलच्या नावाखाली चाललेली लोकांची ही लूट थांबवण्याबद्दल कुणी बोललं का”. 

सौमित्र यांनी पुढे लिहिलं आहे,”एरवीही प्रवास केल्यावर अधून मधून फास्टटॅग मधून पैसे गेल्याचे मेसेजेस तासा दोनतासांनी येत राहतात. ते पैसे कुठे आणि का जातात? अरे लूट थांबवा रे ही…लोक काहीच बोलत नाहीत म्हणून किती लुटणार आहात? कुणाकडे तक्रार करायची? याला जबाबदार अधिकारी कोण आहेत?”. 

किशोक कदम यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. “मोठ मोठे खड्डे आहेत तरी टोल आकारला जातो..नुसता काळाबाजार, सरकार लुटत असते..जनता निमूटपणे लुटत असते, सदासर्वदा हीच परिस्थिती आहे, जुना हायवे वापरा सरळ, सरकार वेगवान आहे, भयंकर लूटमार सुरू आहे, लोकांनाअजूनही बोलता येत नाही हीच मोठी शोकांतिका आहे अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

किशोर कदम यांच्याआधी काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ऋजुता देशमुखनेदेखील (Rujuta Deshmukh) मुंबई-पुणे एक्सप्रेस वेसंदर्भातील पोस्ट शेअर केली होती. तसेच ‘खरचं असा नियम आहे? आणि असला तर तो बरोबर आहे का?’ असा प्रश्न तिने नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना विचारला होता. तसेच ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेते मिलिंद दास्तानेही त्यांना आलेला अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला होता. 

संबंधित बातम्या

Rujuta Deshmukh : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अभिनेत्रीची लूट? ऋजुता देशमुख नितीन गडकरींना टॅग करत म्हणाली,”खरंच असा नियम आहे का?”

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *