Kolhapur Crime Sexual Abuse Of A Four And A Half Year Old Girl Living Next Door Culprit In Police Custudy

[ad_1]

Kolhapur Crime: घराशेजारी राहणाऱ्या साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोल्हापुरात (Kolhapur News) अटक करण्यात आली आहे. शैलेंद्र सखाराम पाटील (वय 44, रा. मुरगूड ता. कागल, सध्या कोल्हापूर) असे त्या विकृताचे नाव आहे. अत्याचार केल्याचे समजताच परिसरातील महिला आणि तरुणांनी शैलेंद्रला बेदम चोप दिला होता. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला मंगळवार 25 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

कोल्हापूर शहरातील एका पेठेमध्ये पती, पत्नी आणि मुलगी असे कुटुंब राहते. संबंधित पीडित मुलीचे वडील बाहेर गावी गेले होते, तर आई एका दुकानात काम करण्यासाठी जाते. 2 ते 16 जुलै या कालावधीत घराशेजारीच राहणाऱ्या शैलेंद्रने मुलगीची आई कामावर गेल्यानंतर जवळीक करून आत्याचार केला. हा घृणास्पद प्रकार मुलीने आईला सांगितला. मुलीच्या आईने जाब विचारताच संशयिताने उडवाउडवीची उत्तरे दिली. संबंधित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. हा सारा प्रकार परिसरात समजल्यानंतर महिला आणि तरुणांनी शैलेंद्रला बेदम चोप देऊन पोलिसांत हजर केले. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी नराधमावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. 

आईच्या डोळ्यादेखत पोटची चिमुकली लेक बसखाली चिरडली

दरम्यान, चार दिवसांपूर्वी कोल्हापुरात मनाला येईल त्या पद्धतीने केलेल्या स्पीडब्रेकरने चिमुकलीचा हकनाक बळी गेला आहे. संस्कृती नेत्रदीप खरात (वय 4) असे त्या निष्पाप दुर्दैवी चिमुकलीचे नाव आहे. शहरातील सानेगुरुजी वसाहतीमध्ये प्रतिराज बंगल्यासमोर केएमटी बस स्टॉप आहे. याच ठिकाणी हा अपघात घडला. आईच्या डोळ्यादेखत चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाल्याने हा प्रसंग पाहणाऱ्यांच्या पोटामध्येच गोळा आला. अरुंद रस्त्यावर बसचालकाने अचानक बस उजव्या बाजूला घेतल्याने दुचाकीला धक्का लागल्यानंतर चिमुरडी संस्कृती खाली कोसळून बसच्या मागील चाकाखाली सापडली.    

स्टॉपवर प्रवासी घेण्यासाठी केएमटी बस (एमएच-09-सीडब्लू-0355) उभी होती. बसने प्रवासी घेतल्यानंतर पुढे जात असतानाच संस्कृतीची आई नेहा खरात त्यांची दुचाकी (एमएच-09-डीएच-0243) वरून ओव्हरटेक करून पुढे जात असतानाच स्पीड ब्रेकरचा अंदाज आला नाही. यामध्येच त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीचे हँडल बसला घासले. त्यामुळे तोल जाऊन नेहा उजव्या बाजूला फेकल्या गेल्या. यावेळी मागे बसलेली चिमुरडी मुलगी संस्कृती रस्त्यावर कोसळली.यावेळी प्रवासी घेतल्याने बसने  वेग घेतल्याने संस्कृती बसच्या मागील चाकात चिरडली. 

इतर महत्वाच्या बातम्या

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *