Kolhapur News Two Youths In Their Twenties Died After Their Car Fell Into A Rivulet Accident In Bhudargad Taluka

[ad_1]

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) भुदरगड तालुक्यातील गारगोटी पाटगाव रोडवर अनफ खुर्दमध्ये कार ओढ्यात कोसळून दोघा तरुणांचा मृत्यू झाला. आदिल कासम शेख (वय 19) आणि झहीर शेख (वय 19, रा. दोघेही अनफ खूर्द, ता. भुदरगड) अशी मृत तरुणांची नावे आहेत. आज (28 जुलै) दुपारी एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातात अन्य एक तरुण जखमी झाला आहे. साहील मुबारक शेख असे त्याचे नाव आहे. अपघात झाल्यानंतर या मार्गावर रहदारी नसल्याने मदतीसाठी उशीर झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी ओढ्यामध्ये उतरून जखमींना बाहेर काढले. मात्र, त्यापूर्वी एकाचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघाताची नोंद भुदरगड पोलिसांमध्ये झाली आहे.

भरधाव कारवरील ताबा सुटला 

मिळालेल्या माहितीनुसार आदिल शेख मित्र झहीर आणि साहील कारने (एमएच-12-6550) कोल्हापूरच्या दिशेने येत होते. यावेळी कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट जाऊन ओढ्यात कोसळली. कार ओढ्यात कोसळल्यानंतर झहीरचा जागीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या अदिलला उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. साहीलवर गारगोटीत उपचार सुरु आहेत. मृत आदिल हा एकूलता एक असल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 

घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू

दरम्यान, कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक खासबाग मैदानाची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील किणे गावामध्ये घराची भिंत कोसळून महिलेचा गुरुवारी (28 जुलै) मृत्यू झाला. सुनिता गुडूळकर असं मृत महिलेचे नाव आहे. आज (27 जुलै) सकाळी ही दुर्घटना घडली. घराच्या चिऱ्याच्या भिंतीखाली दबल्या गेल्याने सुनिता यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत पती अर्जुन गुडुळकर देखील जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या पती आणि नणंद यांना उपचारासाठी नेसरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेची घटनेची माहिती समजल्यानंतर तहसिलदार समीर माने, गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, निवासी नायब तहसिलदार म्हाळसाकांत देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *