[ad_1]
लातूर: जिल्ह्यातील ‘पास ऑन’ उपक्रमची जोरदार चर्चा आहे. आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीने 75 सायकलचे वाटप करण्यात आले आहे. लातूर (Latur) जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळांना या सायकलचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, या सायकल जरी विद्यार्थी वापरत असतील, पण यावर ताबा शाळेचा असणार आहे. त्यामुळे, विद्यार्थी बदलतील मात्र सायकल पुढे ‘पास ऑन’ होऊन, इतर विध्यार्थ्यांना वापरण्यासाठी उपलब्ध राहतील.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शाळेत जाण्यासाठी विध्यार्थ्यांना वाहनांची सोय नसते. यामुळे, बऱ्याच विद्यार्थ्याचे शिक्षण अर्धवट राहते. त्यामुळे, जिल्ह्यातील काही शाळांना आदर्श मैत्री फाउंडेशने 75 सायकलचे वाटप केले आहे. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना या सायकलच लाभ घेतला येईल. तसेच, त्यांचे शिक्षण झाल्यावर ही सायकल पुढील गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येईल. याची व्यवस्था शाळेकडून केली जाईल. एकच सायकल पुढील अनेक वर्ष गरजू विद्यार्थ्यांना लाभ देत राहील, अशी व्यवस्था तयार करण्यात आदर्श मैत्री फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. आज या 75 सायकलचे वाटप जिल्ह्यातील काही शाळेत करण्यात आले आहे. कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे, शिक्षक आमदार विक्रम काळे आणि संस्थेचे पदाधिकारी यावेळी हजर होते.
विध्यार्थ्यांना फायदा होणार…
शहरापासून काही अंतरावर असलेल्या ग्रामीण भागातील अनेक मुलं शिक्षणासाठी लातूर शहरात किंवा तालुक्याच्या ठिकाणी येतात. मात्र, यातील बहुतांश विधार्थी हे शेतकरी कुटुंबातील असतात. ज्यात अनेकांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने मुलांना सायकल घेऊन देणं शक्य नसते. त्यामुळे अनेक विध्यार्थी पायी प्रवास करून शाळा गाठतात. अनेकदा पावसाळ्यात त्यांचे हाल होतात. त्यामुळे, आदर्श मैत्री फाउंडेशने हाती घेतलेल्या ‘पास ऑन’ उप्रकम अशा विध्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. विशेष म्हणजे, संबंधित विध्यार्थ्याचे शिक्षण संपल्यावर तीच सायकल पुन्हा दुसऱ्या नवीन विध्यार्थ्याला वापरता येणार आहे. त्यामुळे या अग्ळावेगळ्या उपक्रमाची जोरदार चर्चा होत असूनm कौतुक देखील केले जात आहे.
मंत्री बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त लातूर जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना त्यांनी जिल्ह्यातील विकासकामांचा आलेख मांडला. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध विकास कामांची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. शेतकरी, मागासवर्गीय व दुर्बल घटकातील व्यक्तींच्या उन्नतीसाठी शासनामार्फत प्रयत्न केले जात असून, यामाध्यमातून लातूर जिल्ह्याच्या विकासाचा वारसा कायम सुरु राहील, अशी ग्वाही क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे यांनी यावेळी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
.
[ad_2]
Source link