Maharashtra News Ahmednagar News Argument Between MLA Rohit Pawar And MLA Ram Shinde Over Karjat ST Depot

[ad_1]

अहमदनगर : कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यात नेहमीच राजकीय संघर्ष पाहायला मिळतो. आता कर्जत येथील एसटी डेपोवरून (Karjat ST Depo) राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आमदार राम शिंदे यांच्यावर टीका केली आहे. तर भाजप आमदार राम शिंदे यांनीही रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

अहमदनगरच्या (Ahmednagar) कर्जत तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून एसटी डेपोची मागणी होत होती. भाजपचे तत्कालीन आमदार राम शिंदे यांनी लवकर कर्जतसाठी स्वतंत्र एसटी डेपो मंजूर केला जाईल, अशी वारंवार घोषणा जाहीर कार्यक्रमातून केली. मात्र डेपो काही आला नाही तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये एसटी डेपोच्या कामाचा शुभारंभच केला. या एसटी डेपोसाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला. पाटेगाव-खंडाळा एमआयडीसीवरून आ. राम शिंदे आणि आ. रोहित पवार यांच्यात अधिवेशन काळात चांगलाच संघर्ष पेटला होता. आता आ. रोहित पवार यांनी एसटी डेपोच्या मुद्द्यांवर आ. राम शिंदे यांना ‘एमआयडीसी (Karjat MIDC) प्रमाणे एसटी डेपोमध्ये नाक खुपसू नका, अन्यथा संविधानिक पद्धतीने उत्तर देऊ’ असा इशारा दिला आहे. 

एसटी डेपोसाठी आम्ही देखील आमच्या कार्यकाळात मदतच केली. माझ्या कार्यकाळात दोन तहसील कार्यालय बांधले, दोन पोलीस स्टेशन बांधले आणि रोहित पवार ज्या रस्त्याने प्रवास करतात. तो रस्ता देखील माझ्याच कार्यकाळात झाला, हे रोहित पवार विसरले का? असे उत्तर आ. राम शिंदे यांनी दिले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडून मतदारसंघात मंजूर करून आणलेल्या कामात राम शिंदे नेहमीच खोडा घालत असल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांकडूनही केला जात आहे. तर भाजप कार्यकर्त्यांकडून एसटी डेपोची पहिली मागणी आम्हीच केली होती आणि त्यासाठी पाठपुरावा देखील आम्हीच केल्याचा दावा केला जात आहे. 

सध्या कर्जत एसटी डेपोचे काम जवळपास 90 टक्के पूर्ण झाले आहे. राज्यात एसटीसाठी तब्बल तीन हजार नव्या एसटी बस खरेदी केल्या जाणार आहेत. त्यातील 50 बसेस या कर्जत डेपोसाठी मिळाव्यात अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची आहे. मात्र, एमआयडीसीप्रमाणेच डेपोवरूनही दोन्ही आमदारांमध्ये कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे राज्यातील राजकारण तापले असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवरही राजकारण धुमसत असल्याचे चित्र आहे. 

इतर संबंधित बातमी : 

Rohit Pawar :कर्जत – जामखेडमध्ये एमआयडीसीसाठी रोहित पवार आग्रही, थेट पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *