Maharashtra Rain : वीज, वादळ वारा सुटणार, आज महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, हवामान विभागाचा इशारा

[ad_1]

Maharashtra Rain : राज्यातील हवामानात (Weather) सातत्यानं बदल होत आहे. कुठं जोरदार पाऊस (Heavy Rain) पडत आहे, तर कुठं उन्हाचा चटका जाणवत आहे. दरम्यान, यावर्षी आत्तापर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

 राज्यातील बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट 

हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसा राज्यातील बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पावसाची शक्यता

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लांबण्याची चिन्हे दिसत आहेत. ला निनामुळं कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे, त्यामुळं सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतात जून महिन्यात मान्सूनचे आगमन होते आणि सप्टेंबर महिन्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होतो. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत संपूर्ण भारतातून मान्सून परततो. देशातील जवळफास निम्मी शेतजमीन ही जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, ‘ला’ निनाच्या प्रभावामुळं यावर्षी मान्सूनचा (Monsoon) मुक्काम वाढणार आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

देशात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा 7 टक्के पाऊस अधिक

सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पावसामुळं सोयाबीन, मका, कापूस यासारख्या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. तर जमिनीत ओलावा राहून खरीप हंगामातील गहू, हरभरा या पिकांना त्याचा फायदा होऊ शकतो. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी भारतात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. देशात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा 7 टक्के पाऊस अधिक झाला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Maharashtra weather : सावधान! आज ‘या’ 11 जिल्ह्यात पडणार जोरदार पाऊस, जाणून घ्या आजचा हवामान विभागाचा अंदाज

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *