Maharashtra SSC Supplementary Results 2023 Results Out On Mahresult.nic.in Direct Link

[ad_1]

पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल (SSC Result) जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 29.86 टक्के लागला आहे. निकालात 51.47 टक्क्यांसह लातूर विभाग पहिल्या स्थानावर आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाने परिपत्रकाद्वारे  दहावीचा निकाल आणि विभागवार टक्केवारी जाहीर केली.

लातूर विभाग अव्वल तर मुंबई विभागाचा सर्वात कमी निकाल 

दहावीच्या निकालात लातूर विभागाने बाजी मारली आहे. तर त्याखालोखाल अमरावती, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे आणि मुंबई विभागाने कामगिरी केली आहे. लातूर विभागाचा सर्वाधिक 51.47 टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी  15.75 टक्के निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. 

विभागवार निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 18 जुलै ते  1 ऑगस्ट या कालावधीत पार पडली. यंदा दहावीच्या परीक्षेला  49 हजार 377 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परंतु मागील तीन वर्षाच्या तुलनेत यंदाची निकालाची आकडेवारी घसरली आहे. निकालासंदर्भात काही आक्षेप असेल किंवा गुणपडताळणीसाठी अर्ज करायचे असेल तर अर्ज करण्याची मुदत 29 ऑगस्ट  ते 7 सप्टेंबरपर्यंत  करता येणार आहे.

अर्ज कुठे आणि कसा कराल?

दहावीच्या निकाल जाहीर झाला आहे. त्यात अनेक विद्यार्थ्यांना निकालाबाबत अनेक अडचणी किंवा आक्षेप असल्यास तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणीसाठी, उत्तरपत्रिका प्रत मिळवण्यासाठी, पुनर्मूल्यांकन यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर verification.mh-ssc.ac.in अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज करताना सगळी माहिती, अटी शर्ती आणि सुचना वेबसाईटवर देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेसाठी ऑनलाईनच पैसे भरावे लागणार आहेत. यासाठी आवश्यक शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Debit Card/Credit Card/UPI/Net Banking) भरता येईल.

– गुणपडताळणीसाठी अर्ज क  29 ऑगस्ट  ते 7 सप्टेंबरपर्यंत  करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक  आहे. गुणपडताळणीसाठी प्रति विषय रु.50/- शुल्क ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे जमा करावे लागेल. जुलै- ऑगस्ट- 2023 च्या परीक्षेतील

विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स कॉपी मागणीसाठी 

  • ई-मेलद्वारे/संकेतस्थळावरुन 
  •  स्वत: जाऊन घेणे
  • पोस्टाने यापैकी एका पर्यायाची निवड करता येईल आणि त्यांनी मागणी केलेल्या पद्धतीने झेरॉक्स कॉपी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. झेरॉक्स कॉपीसाठी प्रति विषय 400 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *