Marathi Movie Telly Masala Latest Update Know Siddharth Jadhav Movies And Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Update

[ad_1]

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या…

Nivedita Saraf: पहिल्यांदा कोणी प्रपोज केलं? ते लग्नानंतर अशोक मामांनी दिलेलं पहिलं गिफ्ट; निवेदिता सराफ यांनी सांगितल्या आठवणी

Nivedita Ashok Saraf: अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) या त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. त्या मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांनी त्यांना दिलेल्या गिफ्टबाबत सांगितलं.

Siddharth Jadhav : साधी राहणी, प्रेमळ स्वभाव अन् उत्तम अभिनय कौशल्य असणारा ‘कॉमेडी किंग’ सिद्धार्थ जाधव; जाणून घ्या ‘आपल्या सिद्धू’चा सिनेप्रवास…

Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हा मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. सिद्धार्थचं संपूर्ण नाव ‘सिद्धार्थ रामचंद्र जाधव’ असं आहे. मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टीतही सिद्धार्थने स्वत:ला सिद्ध केलं आहे. नाटक, मालिका आणि सिनेमांच्या माध्यमातून सिद्धार्थने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्धनं ईशाला खोलीत बंद केले; आई कुठे काय करते मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले…

Aai Kuthe Kay Karteआई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमध्ये सध्या मोठा ट्वीस्ट अँड टर्न येत आहेत. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसते की अनिरुद्ध हा ईशाला एका खोलीमध्ये कोंडत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Spruha Joshi: स्पृहा सहा वर्षाची असताना तिच्या आई-बाबांनी दिलं होतं ‘हे’ खास गिफ्ट; अभिनेत्रीनं सांगितला किस्सा

Spruha Joshi: अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) ही तिच्या कवितांनी आणि अभिनयांनी प्रेक्षकांची मनं जिंकत असते. स्पृहानं नुकतीच वायफळ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये स्पृहानं तिच्या बालपणीच्या आठवणी आणि शाळेबद्दल सांगितलं. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Baipan Bhaari Deva : होऊ दे खर्च… सिनेमा आहे घरचा; चारचौघींनी सुपरहिट केलाय ‘बाईपण भारी देवा’

Baipan Bhaari Deva : ‘होऊ दे खर्च… सिनेमा आहे घरचा’ असं म्हणत महिलावर्ग मोठ्या प्रमाणात ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा पाहायला जात आहेत. 23 दिवसांपूर्वी सिनेमागृहात प्रदर्शित झालेला हा सिनेमा अनेक महिलांनी पुन्हा-पुन्हा पाहिला आहे. महिलांसह पुरुष मंडळींनीदेखील हा सिनेमा पाहिला आहे. पण तराही ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा महिलांनी डोक्यावर घेतला आहे.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *