Marathi Movie Telly Masala Marathi Serial Latest Update Marathi Movies Subhedar Box Office Collection Ajinkya Deo Post After Seema Deo Death Kishor Kadam Akshaya Deodhar Gashmeer Mahajani

[ad_1]

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या…

Subhedar : हातात भगवा झेंडा अन् ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत प्रेक्षकांनी पाहिला ‘सुभेदार’; वीकेंडला बॉक्स ऑफिसवर केली छप्परफाड कमाई

Subhedar Movie Box Office Collection : ‘सुभेदार’ (Subhedar) हा बहुचर्चित ऐतिहासिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता हा ‘सुभेदार’ प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने ते सहकुटुंब हा सिनेमा पाहायला जात आहे. हातात भगवा झेंडा आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत प्रेक्षक ‘सुभेदार’ सिनेमा पाहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Ajinkya Deo : सीमा देव यांच्या निधनानंतर अजिंक्य देव यांची भावूक पोस्ट; म्हणाले, ‘आई बाबा दोघेही गेले…’

Seema Deo : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांचे निधन झाले. सीमा देव यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. अनेक कलाकारांनी तसेच त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरच्या माध्यमातून सीमा देव यांना श्रद्धांजली वाहिली. सीमा देव यांचे पूत्र अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांनी नुकतीच एक भावूक पोस्ट शेअर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सीमा देव आणि  रमेश देव यांच्या आठवणींना उजाळा दिला. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Kishor Kadam : “अरे लूट थांबवा रे ही…”; मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कवी सौमित्र यांची लूट? पोस्ट शेअर करत म्हणाले,”कुणाकडे तक्रार करायची?”

Kishor Kadam : किशोर कदम (Kishor Kadam) उर्फ सौमित्र सध्या चर्चेत आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) विनाकारण दोन वेळा टोल घेत असल्याने राजकीय मंडळी, सेलिब्रिटींसह सर्वसामान्य मंडळींना याचा फटका बसत आहे. सेलिब्रिटी मंडळींना अनेकदा मुंबईपुणे असा प्रवास करावा लागतो. प्रत्येकवेळी हा प्रवास करताना त्यांना खिशाला कात्री बसत आहे. आता किशोर कदम यांनी पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Akshaya Deodhar : अक्षयाची पहिली मंगळागौर; अभिनेत्रीच्या हातावर रंगली मेहंदी, शेअर केला खास व्हिडीओ

Akshaya Deodhar:  ‘तुझ्यात जीव रंगला’ (Tujhyat Jeev Rangala) मालिकेमुळे अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) यांना विशेष लोकप्रियता मिळाली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या विवाह सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अक्षया आणि हार्दिक हे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच अक्षयानं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षयाच्या हातावर मेहंदी काढलेली दिसत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Gashmeer Mahajani : ‘तुमच्या आई वडिलांचं अरेंज मॅरेज झालं होतं की लव्ह मॅरेज?’; चाहत्याचा प्रश्न, गश्मीर महाजनी उत्तर देत म्हणाला, ‘त्यांचे..’

Gashmeer Mahajani:  अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) हा  चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असतो. नुकतेच गश्मीरनं अस्क गश हे सेशन केलं. या सेशनमध्ये अनेक नेटकऱ्यांनी गश्मीरला विविध विषयांवर आधारित असणारे प्रश्न विचारले. या प्रश्नांना गश्मीरनं उत्तरं दिली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *