Marathi Movie Telly Masala Marathi Serial Latest Update Singer Rohit Raut In Marathi Serial 36 Guni Jodi To Netizens Got Angry After Watching Aai Kuthe Kay Karte Promo

[ad_1]

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या…

Vandana Gupte: ‘माझ्या नव्या गाडीचं प्लास्टिक कव्हर फाडलं…’; वंदना गुप्ते यांनी सांगितला राज ठाकरेंचा मजेशीर किस्सा

Vandana Gupte: गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte) ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) या हजेरी लावणार आहेत. वंदना गुप्ते यांनी खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये अनेक मजेशीर किस्से आणि आठवणी सांगितल्या.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Baipan Bhaari Deva : ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा फक्त महिलांनी नाही तर प्रत्येक पुरुषांनीही पाहायला हवा : राज ठाकरे

Baipan Bhaari Deva : ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) या सिनेमाचा सध्या सर्वत्र बोलबाला आहे. ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरील सत्ता गाजवत आहेच परंतु आता प्रतिष्ठीत व्यक्तिमत्वांनीही या सिनेमाचं भरभरुन कौतुक केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीदेखील हा सिनेमा पाहिला असून ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा फक्त महिलांनी नाही तर प्रत्येक पुरुषांनीही पाहायला हवा, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Kon Honar Crorepati : शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? Msc. Bed शिक्षिकेनं चक्क लाईफलाईन घेतली

Kon Honar Crorepati : ‘कोण होणार करोडपती’ (Kon Hanar Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी होत असतात. आता नुकत्याच पार पडलेल्या भागात छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्याविषयी विचारण्यात आलेल्या एका सोप्या प्रश्नाचे उत्तर शिक्षिका देऊ शकलेली नाही.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Aai Kuthe Kay Karte: ‘ईशासारखी स्वार्थी मुलगी…’; आई कुठे काय करतेचा प्रोमो पाहिल्यानंतर ईशावर भडकले नेटकरी

Aai Kuthe Kay Karteआई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. या मालिकेमध्ये अनेक ट्वीस्ट अँड टर्न येत असतात. नुकताच आई कुठे काय करते  या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अनिरुद्ध हा ईशावर चिडला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Rohit Raut : ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’फेम रोहित राऊतचं अभिनय क्षेत्रात पदार्पण; ‘या’ मालिकेत दिसणार

Rohit Raut : ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला रोहित राऊत (Rohit Raut) आता अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. झी मराठीवरील ’36 गुणी जोडी’ (36 Guni Jodi) या मालिकेत त्याची एन्ट्री झाली आहे. या मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *