Mhada News Update On Petition Replated To Kanamvar Nagar Redevelopment At Vikroli

[ad_1]

मुंबई : विक्रोळी येथील कन्नमवार नगरसाठी नवा कम्युनिटी हॉल दिला जाणार आहे, अशी माहिती म्हाडानं (MHADA) मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. त्यावर या हॉलचा वापर कोण आणि कशासाठी करू शकतो याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश हायकोर्टानं म्हाडाला दिले आहेत. न्यायमूर्ती एन. जमादार यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर म्हाडाचे वकील प्रकाश लाड यांनी गुरूवारी ही माहिती दिली. त्याची नोंद घेत हायकोर्टानं वरील आदेश देत सुनावणी 21 ऑगस्टपर्यंत तहकूब केली.

काय आहे प्रकरण?

कन्नमवार नगर इथं एकूण 29 इमारती आहेत. या इमारतीचे बांधकाम साल 1966 मध्ये झालेलं आहे. सध्या या इमारतींचा पुनर्विकास सुरु आहे. मात्र येथील कम्युनिटी हॉलवरुन कन्नमवार नगर सोसायटी व म्हाडामध्ये सध्या वाद सुरु आहे. यासंदर्भात दाखल याचिकेवर सध्या हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. इथल्या इस्टेट मॅनेजरनं हे बांधकाम पाडण्याची धमकी दिली आहे, असा असोसिएशनचा दावा आहे. याशिवाय घरं रिकामी करण्याची कार्यकारी अभियंत्याची नोटीसही बेकायदा आहे, असंही असोसिएशनचे म्हणणं आहे. मात्र जागा रिकामी करुन इमारतीचा ताबा लवकरात लवकर द्यावा जेणेकरुन इथं पुनर्विकास करता येईल, अशी भूमिका म्हाडानं आपल्या प्रतिज्ञापत्रातून नमूद केली आहे.

म्हाडाला सध्या इमारत क्रमांक 17 आणि 19 तसेच कार्यालयीन इमारत 5 व 6 चा पुनर्विकास करायचा आहे. असोसिएशनच्या ताब्यात 1 ते 29 क्रमांकाच्या इमारती आहेत. ज्यामध्ये 464 घरे आहेत. यातील 26 इमारतींपैकी 20 इमारतींचा पुनर्विकास झालेला आहे. तर इमारत क्रमांक 5 मधील कार्यालय हे सोसायटीला दिलं होतं. त्यासाठी त्यांच्याकडून भाडं घेतलं जात होतं. मात्र त्याचा नोंदणीकृत करार झालेला नव्हता. 

या जागेचा खासगी कार्यक्रमांसाठी वापर करून त्याद्वारे नफा कमावला जात होता. मात्र मुळात याची परवानगीच नव्हती, असंही म्हाडानं आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेलं आहे. 17 आणि 19 क्रमांकच्या इमारतीचा पुनर्विकास तातडीनं करण्यात येईल व तेथील रहिवाशांना घरे दिली जातील. तसेच तिथं नवा कम्युनिटी हॉलही दिला जाईल. ज्याचा वापर सोसायटी करु शकेल, असी माहिती म्हाडानं आपल्या प्रतिज्ञापत्रात दिलेली आहे.

ही बातमी वाचा: 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *