Movies Earning Increased Bai Pan Bhari Deva Gadar 2 Business

Movies Earning Increased Bai Pan Bhari Deva Gadar 2 Business

[ad_1]


Movies Earning Increased : सिनेमाच्या पडद्याला चांगले दिवस, अनेक चित्रपटांची कोट्यवधींची कमाई

मल्टिस्क्रीन असो किंवा सिंगल स्क्रीन असो… सगळी थिएटर सध्या प्रेक्षकांच्या धबधब्याने ओथंबून वाहतायत. प्रेक्षकांच्या इतक्या उड्या पडतायत की, सिनेमाच्या पडद्याला सध्या अक्षरश: सोन्याचे दिवस आलेत. खरंतर, गेल्या काही वर्षांत सिनेमे चालत नसल्याची ओरड होत होती. मात्र, बाईपण भारी देवा हा आपला मराठमोळा सिनेमा आला आणि थिएटर्सचा गल्लापण लयभारी होऊन गेला. त्यानंतर, परदेशातून आलेल्या मिशन इम्पॉसिबल आणि बार्बी, ओपनहायमर सिनेमांनीही इम्पॉसिबल म्हणता येईल, एवढी कमाई केली. रणवीर सिंग आणि आलिया भट यांनीही सिनेमाच्या खिडकीवर चांगलाच जलवा दाखवला. त्यानंतर आला, सनी पाजींचा गदर टू… ज्या दणक्यात गदर-२ मध्ये फायटिंग दाखवली गेलीय, तितक्याच दणक्यात तिकीटबारीवरही गल्ल्याने धूमधडाका केलाय. एकूणच, सध्या सिनेमांना सोन्याचे दिवस आलेयत.

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *